गढूळ वातावरणावर कवींनी परखडपणे भाष्य केलं पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन

  • Written By: Published:
गढूळ वातावरणावर कवींनी परखडपणे भाष्य केलं पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन

Raj Thackeray : आपल्या आजूबाजूला सध्या जे काही गढूळ वातावरण तयार झालं आहे, त्याच्यावर कवींनी बोलायला पाहिजे. कवींनी निडरपणे भोवतालच्या समाजव्यवस्थेवर परखड भाष्य केलं पाहिजे, आणि ते त्याच वेळी बोलणं गरजेचं आहे, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केलं. ते रावण पब्लिशिंग हाऊसच्या एका कार्यक्रमात ठाण्याला बोलत होते.

https://www.youtube.com/watch?v=3UoWv9XTJzE

आज रावण पब्लिशिंग हाऊसच्यावतीने कवी कुसुमाग्रज यांच्या अप्रकाशित कवितांचा संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशित झाला. यावेळी राज ठाकरे हे देखील मंचावर या कार्यक्रमासाठी उपस्थितर होते. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आपल्या आजूबाजूला जी काही परि्स्थिती आहे, जे गढूळ वातावरण तयार झालंय, त्याच्यावर कवींनी बोलायला पहिजे. भूमिका घेऊन समाजव्यवस्थेवर कवींनी बोलायला हवं. आणि ते त्याच वेळी बोलणं गरजेचं आहे. लेखक-कवींना वास्तवाचं भान असणं ही काळाची गरज आहे. आपल्या आजूबाजूला भीषण वास्तव असतांना त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. समकालिन परिस्थितीवर कवी जर बोलेलेत, तरच कवीचंही महत्व वाढेल, असं राज ठाकरे म्हणाले.

ते म्हणाले, कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू घेणं, किंवा विरोध करणं हा मुद्दा नाही. मात्र, परिस्थितीवर भाष्य केलं पाहिजे. कवींना महत्व प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर कवींनी सद्यस्थितीवर भाष्य करण्याचं धाडस दाखवलं पाहिजे, असं ते म्हणाले.

गढूळ वातावरणावर कवींनी परखडपणे भाष्य केलं पाहिजे, राज ठाकरेंचा कवींना आव्हान 

ते म्हणाले, आपल्याकडे खूप मोठी माणसं होऊन गेली. पण, आपल्याला त्यांचं महत्व नाही. आपण सांस्कृतिक वारसा जतन करण्यात खूप मागास आहोत. मी इंग्लंडला गेलो, तेव्हा शेक्सपिअरचं घर पाहिलं. ती वास्तू तिथल्या लोकांनी फार जपून ठेवली. ते आपल्याला शेक्सपिअरचं महत्व पटवून देतात. मात्र, आपण आपल्या लोकांचं मोठेपण मान्य करत नाही, ही खंतही राज ठाकरेंनी बोलून दाखवली.

यावेळी बोलतांना त्यांनी कवी कुसुमाग्रज आणि चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्याविषयीचा एक किस्साही त्यांनी सांगितला. ते म्हणाले, कुसुमाग्रज हे फार थोर व्यक्ती होते. त्यांचं महत्व कुणाला किती आहे ठाऊक नाही. मात्र, एका बंगाली माणसाला या कुसुमाग्रजांचं थोरपण ठाऊक होतं. त्यांची विद्वत्ता माहिती होती. त्यामुळंच आनंद चित्रपट रिलीज झाला तेव्हा खुद्द दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना तो चित्रपट कुसुमाग्रजांनी बघावा आणि त्यावर अभिप्राय द्यावा, असं वाटलं होतं. त्यानंतर हृषिकेश मुखर्जींनी चित्रपटाची रिळं गाडीत टाकून ते नाशिकला आहे. एका थिएटर बुक करून त्यांनी आनंद चित्रपट तात्यासाहेबांना दाखववला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube