‘कोळी बांधव हे मूळ शिवसेनेसोबतच…; संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

‘कोळी बांधव हे मूळ शिवसेनेसोबतच…; संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची काल शिवसेना (Shiv Sena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात सभा झाली. या सभेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा दिसत आहे. कारण, या सभेत भाजपा आणि शिंदे गटाच्या नेतेमंडळींनी भाषणांमधून जोरदार टोलेबाजी केली. शिवाय या सभेत शिंदे गट आणि भाजपा शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं बोललं गेलं होतं. मात्र अपेक्षेप्रमाणे या सभेस गर्दी नसल्याचे दिसून आले. यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीकास्त्र सुरू केले. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, अनेक समस्या आहेत, परंतु तरी अत्यंत हीन दर्जाच्या राजकारणात जर मुख्यमंत्री पडणार असणार आणि त्याकरिता सत्ता वापरणार असतील. तर जनता सर्वकाही बघत असते आणि मग जनता अशा मुख्यमंत्र्यांकडे पाठ फिरवते. हे काल वरळीत आपण बघितलं आहेच. याबरोबरच कोणी काहीपण म्हणू द्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या आव्हानाच्या आवेशात ते आणि त्यांचा बंडखोर गट काल वरळीतील कोळीवाड्यात गेला होता.

एक विराट सभा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतू खुर्च्या उचलण्याची वेळ आली आणि थातूरमातूर उद्योग करून तो कार्यक्रम पूर्ण केला.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होऊ नये, या मताचे आम्ही आहोत. त्या पदावर जरी आमचे विरोधक बसले असले तरी कोणीही, गद्दार, बेईमान बसले असले कुठेही तरी शेवटी मुख्यमंत्री पदाची खुर्ची आहे. आपण मुख्यमंत्री म्हणून तिथे आला होता, की आव्हानांची भाषा करण्यासाठी आला होता, बंडखोर गटाचे नेते म्हणून आला होता ? याचा विचार आता या सगळ्यांनी केला पाहिजे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

या मुंबई शहरात कोळी समाज, कोळी बांधव, कोळी वाडे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून, शिवसेनेबरोबर ठामपणे उभे आहेत. आम्ही त्यांच्याकरिता काम केलं आहे. कोळीवाड्यांच्या विकासासाठी काम केलं आहे. मुंबई शहरात सर्व जाती- पाती, प्रमुख धर्म, पंथ यांचा विचार न करता आम्ही काम केलं आहे. कोळीबांधव हे मुंबईतील मूळचे रहिवासी आहेत. यामुळे ते मूळ शिवसेनेसोबत आहेत. हे काल स्पष्ट दिसून आलं आहे. मला कोणावर टीका करायची नाही, पण अशी बेअब्रू परत राज्याच्या मुख्यमंत्र्याची होऊ नये, याची काळजी त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने घेतली पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकेचे बाण सोडले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube