सामनाच्या अंगणात धडाडणार शिंदेंची तोफ; थेट राऊतांना नडणार

सामनाच्या अंगणात धडाडणार शिंदेंची तोफ; थेट राऊतांना नडणार

Shrikant Shinde Vs Sanjay Raut :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार बनवल्यापासून शिवसेना व ठाकरे गट यांच्यामध्ये अनेकदा संघर्ष पहायला मिळाला आहे. विशेष करुन मुंबई व ठाणे परिसरामध्ये तर अनेकदा शिवसेनेच्या शाखांच्या वादावरुन हाणामारी झाली आहे. त्यानंतर आता शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे गेले आहे. त्यानंतर हा संघर्ष अतिशय तीव्र झाला आहे.

या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे हे आज सामना वृत्तपत्राच्या परिसरातील शाखेत जाणार आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात जावून ठाकरेंना आव्हान दिलं. तर आदित्य ठाकरेंनी ठाण्यामध्ये जावून शिंदेंना आव्हान दिलं.  याच पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे हे सामनाच्या परिसरातील शिवसेनेच्या शाखांना भेट देणार आहे. शिवसेनेच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी शाखा संपर्क अभियान सुरु केले आहे. यासाठी श्रीकांत शिंदे हे मुंबईतील शिवसेनेच्या शाखांना भेटी देत आहे.

Ajit Pawar : शिंदे-फडणवीसांची सटकलीय, डोकं जरा ठिकाण्यावर आणा… अजितदादांची फटकेबाजी

आज ( मंगळवारी ) 6 जून रोजी श्रीकांत शिंदे हे माहिम मतदारसंघातील शाखांना भेटी देणार आहे. सामना कार्यालय व शिवसेना भवन हे दोन्ही माहिम मतदारसंघात आहे. शिंदेंसोबत गेलेले सदा सरवणकर हे देखील याच मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेनेतल्या फाटाफुटीनंतर पहिल्यांदाच श्रीकांत शिंदे सामना शेजारच्या प्रभादेवी शाखेला भेट देणार आहे. शिवसेनेच्या राजकारणात मातोश्री, सामना व शिवसेना भवन ही प्रतिकं मानली जातात. या भेटीतून श्रीकांत शिंदे त्यालाच आव्हान देणार असल्याचे बोलले जात आहे.

Amit Shah : चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी भाजपची रणनिती; अमित शाह यांची नांदेडमध्ये सभा

नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सामना परिसरात सभा घेतली होती. त्यावेळी शिवसैनिक  अरविंद भोसले यांनी राणेंचं स्टेज जाळण्याचा प्रयत्न केला होता. याच पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंच्या प्रभादेवी शाखेच्या भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube