Ajit Pawar : शिंदे-फडणवीसांची सटकलीय, डोकं जरा ठिकाण्यावर आणा… अजितदादांची फटकेबाजी
Ajit Pawar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सटकलीय, त्यांनी जरा डोकं ठिकाण्यावर आणावं, या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फटकेबाजी केलीय. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार जाहिरातबाजीवर शेकडो रुपये खर्च करुन महाराष्ट्राला फसवण्याचा धंदा करत असल्याचा आरोपही अजित पवारांनी केला आहे. (Ajit pawar criticizes cm eknath shinde devendra fadnvis)
प्रकाश आंबेडकर हे नुसती राजकारणाची दिशा भरकट आहेत; फडणवीसांची टीका
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातबाजी जोरात सुरु आहेत. त्यांनी शासन आपल्या दारी उपक्रम सुरु केलाय. शासनाने न घेतलेले निर्णय या जाहिरातबाजीतून दाखवले जात असल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. यावेळी अजित पवार यांनी उदाहरण देऊनच शिंदे-फडणवीस सरकारकडे बोट दाखवलं आहे.
राऊतांवर टीका करतांना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, एकेरी उल्लेख करत बाप काढला
ते म्हणाले, एका जाहिरातीमध्ये दोन तरुणी चर्चा करताहेत. ही योजना विधवा, दिव्यांग, परितक्त्या आणि तृतीयपंथीयांसाठी आहे. सरकारने ही या योजनेपासून शेतकरी बेरोजगारांना लाभ मिळणार असल्याचं म्हटलंय.
ही योजना विधवा महिलांसाठी आणि सरकारने जाहिरातीत तरुणी दाखवल्या असल्याचंही पवार यांनी म्हटलंय. तसेच इतक धादांत खोटं का? असा सवाल करीत शिंदे-फडणवीसांनी ही जाहिरात बसून पहावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.
ठरलं!…NCP चा शिरुर लोकसभा 2024 चा उमेदवार अमोल कोल्हेचं….शरद पवार
तर दुसरी रोजगार हमी योजनेची जाहिरातही चुकीची दाखवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शासनाची रोजगार हमी योजना नेमकी कोणासाही आहे हे तपासून पहावं. शिंदे-फडणवीस जरा डोकं ठिकाण्यावर आणा, खरंच सटकलीय, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना सर्वच योजनांबद्दल माहिती असूनही शेकडो कोटी रुपये खर्च करुन महाराष्ट्राला फसवण्याचा धंदा सरकारने चालवला असल्याचं आरोप त्यांनी केला आहे.