Eknath Shinde : ‘काही’ लोक सुप्रीम कोर्टालाच सल्ले द्यायला लागले
मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. काही लोक सुप्रीम कोर्टालाच सल्ले द्यायला लागले, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे.
शिवसेना कुणाची यावरून सुरू असलेल्या वादावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवी मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टात जोपर्यंत 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाची सुनावणी होऊ नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. शिवाय, पळपुट्यांना पक्षावर हक्क सांगण्याचा कुठलाही अधिकार नसतो, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीध्ये बहुमताला फार किंमत असते. निवडणून आलेल्या लोकप्रतिनिधींनाही महत्व असतं. निवडून आलेल्या खासदार- आमदारांमुळेच सरकार स्थापन होत असते. त्यामुळे या राज्यात कायद्याचं राज्य आहे. बहुमतांचं राज्य आहे. त्यामुळं कुणाला काय वाटतं, यापेक्षा कायद्यानं काय योग्य आहे, हे जास्त महत्वाचं आहे. मात्र, आता काही लोक हे सर्वोच्च न्यायालयाच सल्ले द्यायला लागले, त्याला काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवाय, मुख्यनेता हे पद घटनाबाह्य हेही सुप्रीम कोर्ट ठरवेल, असंही शिंदे म्हणाले.
अहमदनगर काँग्रेसचं शिष्टमंडळ थोरातांसह पटोलेंची भेट घेणार