सुशांत सिंगने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच…राणेंचा आरोप

Untitled Design (19)

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाली आहे. असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

यावेळी बोलताना राणे म्हणाले, सुशांतची हत्या झाले हे सिद्ध होत आहे. कुपर हॉस्पिटलचे डॉक्टर कुमार शहा यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या सत्य आहेत. त्यांना सुशांतचा पोस्टमार्टम करताना व्हिडिओ ग्राफी सुद्धा करू दिलेली नाही.

मात्र डॉ. कुमार शहा हे त्यावेळी हॉस्पिटलमध्ये होते का असा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होत, मात्र रात्री सुशांत सिंग राजपूत याचा मृतदेह ॲम्बुलन्समध्ये ठेवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, तर त्यावेळी उद्धव ठाकरे यांचं सरकार होत.

त्यावेळी डॉ. शहा यांच्यावर कोणी दबाव टाकला असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे. तर त्यावेळी नक्की कोणाला वाचवायचा प्रयत्न केला ? बेबी पेंग्विनला वाचवण्याचा प्रयत्न होता का असा प्रश्न आहे त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Tags

follow us