मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

Mumbai-Pune Expressway landslide : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर (Mumbai-Pune Expressway) दरड कोसळण्याची आणखी एक घटना घडली आहे. कामशेत बोगद्याजवळ ही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. (The landslide occurred near the Kamshet tunnel near the Mumbai Pune Expressway)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यात मुंबई आणि पुण्याचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वी इर्शाळवाडीत दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर मुंबईतही एक दोन ठिकाणी दरड कोसळली होती. आताही मुंबईच्या कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई एक्सप्रेस मार्गावरील कामशेत बोगद्याजवळ ही दरड कोसळली आहे. पावणे नऊ वाजता ही घटना घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मुंबईकडे जाणार्‍या लेनवर दरड कोसळल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Research Vessel : समुद्रात संशोधन जहाज भरकटलं! कोस्टगार्डने बाजी लावत केली सुटका… 

रविवारी रात्री साडेदहा वाजता मुंबई रस्त्यावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळण्याची पहिली घटना घडली आणि त्याच मध्यरात्री ३ वाजता लोणावळ्याजवळ दुसरी दरड कोसळली. चार दिवसांनंतरची ही तिसरी घटना घडली आहे. पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर मातीचा ढिगारा कोसळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहतूक सुरळीत आहे. पावणे नऊ वाजता घडलेल्या घटनेनंतर एका लेनमधून वाहतूक सुरू आहे. काही कालावधीत हा मातीचा ढिगारा बाजूला घेतल्यावर उर्वरित दोन लेनही सुरू केल्या जातील.

मार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जोगेश्वरी ते मालाड दरम्यान सध्या वाहतूक कोंडी झाली आहे.

दरम्यान, दरड कोसळल्याची माहिती मिळताच आयआरबीचे कर्मचारी व देवदूत आपत्कालीन पथक आणि खंडाळा व वडगाव महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आयआरबी आणि देवदूत आपत्कालीन पथक रस्त्यावर पडलेली दरड जेसीबी व अन्य यंत्रांच्या साहाय्याने हटविण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube