Ajit Pawar Vs Dhananjay Desai … ते इतिहासात मुतू लागले, त्यांना आता डायपर घाला

  • Written By: Published:
Ajit Pawar Vs Dhananjay Desai … ते इतिहासात मुतू लागले, त्यांना आता डायपर घाला

पुणे : आदिलशाहीचा उकिरड्यावरून पुणे शहरात आलेल्या काही सरदारांनी गाढवाचा नांगर फिरवला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यानंतर त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला. तर धरणांमध्ये मुतून शेतकऱ्यांच्या ओला जखमांवर जखमा करणारे आता इतिहासात मुतू लागले आहेत, त्यांना डायपर घातले पाहिजे, असे नाव न घेता राज्याचे विराेधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हिंदू राष्ट्र समितीचे धनंजय देसाई (Dhananjay Desai) यांनी खालच्या पातळीवर टीका केली.

धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करण्यात यावेत या आणि इतर मागण्यांसाठी रविवारी (दि.22) राेजी सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. लाल महल ते डेक्कन असा माेर्चा काढण्यात आला.

धनंजय देसाई म्हणाले की, शेतकऱ्यांनी कितीही मशागत केली तरी काँग्रेस उगवतच. त्यामुळे वारंवार खुरपावे लागते. तसे अदीलशाईने जो गाढवाचा नांगर फिरवला तो बारामतीपर्यंत गेला आणि तिथे ही पिलावळ जन्माला आली. आम्हाला काेणत्याही पक्षांची लंगोट नेसायची नाही. तर आम्हाला जिहादी यांचा गर्भ मारायचा आहे. हिंदू जन आक्रोश आंदोलन हे पुण्यश्वर मुक्त करण्यासाठी आहे. अजित पवार म्हणाले, की धर्मवीर संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. मात्र, मी म्हणताे की, कदाचित तुम्ही पवार नसू शकाल. पण छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते. हा लढा राजकीय नाही हे हिंदू हिताचे राजकारण आहे. दीड दमडीच्या राजकीय नेत्यांनी आम्हाला धर्माची व्याख्या सांगू नये.

तर भाजपचे तेलंगणाचे आमदार राजसिंह म्हणाले, जिहादीं काे चून चून माराे. गाेल टाेपी वाल्यांकडून मतांची आपेक्षा करु नका. तर छत्रपती संभाजीराजांना ‘धर्मवीर’ न म्हणणार्यांना महाराष्ट्रातील जनतेने नाकारले पाहिजे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube