भिडेंना गुरुजी म्हणण्यावरुन उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका; ‘…ही पद्धतच घातक’
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : फडणवीस जर भिडे यांना गुरुजी म्हणत असतील तर त्यांचं सगळंच बरोबर असं म्हटलं पाहिजे, अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. संभाजी भिडेंबाबत मी काय बोलणार? शासनकर्ते ते आहेत त्यांनी यावर बोललं पाहिजे. मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया कशी काय देणार? राज्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे हे योग्य आहे आणि अयोग्य आहे, असेही ते म्हणाले.
आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाळत आहोत. त्यातून काही मिळणार नाही. इतिहासात गुंतवून ठेवायचं आणि देशाला आणि राज्याला मारायचं ही पद्धतच घातक आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी चांगले धडे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावेत हीच अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात कोरोनाची रिएंट्री! रुग्णांची संख्या शंभरीकडे, मुंबई-पुण्यात सर्वांधिक रुग्ण
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावल्याने महाविकास आघाडीचे नेते नाराज झाल्याचे बोलले जात होते. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की काल शरद पवार यांचे भाषण बोलके होते. ते भाषण ऐकून त्यातील बारकावे लक्षात घेतले पाहिजेत. विशेषता त्यांनी सर्जीकर स्ट्राईकसह अजून एक दोन गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.
प्रत्येक अधिवेशनाच्या काळात आमची एक बैठक होते असते. मागील अधिवेशनात देखील झाली होती. काही वेळा विषय ठरवलेले असतात तर काही वेळा अचानक विषय तयार होतात. त्या विषयावर एकत्रित पुढं कसं जायचं हे आम्ही ठरवतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
भरतीमधील तोतयागिरीला आता बसणार चाप ! वनविभागाची भरती संगणकीकृत, मानवी हस्तक्षेपच नाही
समृद्धी महामार्गावर झालेला अपघात दुर्दैवी आहे. हा अपघात कसा झाला याची माहिती घेतली तर फार भयंकर आहे. अशा प्रकारच्या त्रुटी आजच्या काळात राहू शकतात हे फार धक्कादायक आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.