भरतीमधील तोतयागिरीला आता बसणार चाप ! वनविभागाची भरती संगणकीकृत, मानवी हस्तक्षेपच नाही

भरतीमधील तोतयागिरीला आता बसणार चाप ! वनविभागाची भरती संगणकीकृत, मानवी हस्तक्षेपच नाही

मुंबई : वन विभागाच्यावतीने नुकतीच वन संरक्षक (Forest guard) पदांची परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर हा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांना या परीक्षेचे उत्तर सांगू, असं आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली. याशिवाय, नोकरीला लावून देण्याचं आमिष दाखवूनही फसवणूक केली जाते. दरम्यान, आता वन विभागाच्यावतीने (Forest Department) ही वनविभागाची पदभरती प्रक्रिया संपूर्णपणे संगणकीकृत असल्याचं सांगून फसवणूक करणाऱ्यांना बळी न पडता  सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.  (Forest Department On Forest guard exam they said exam organised by TCS)

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या वनरक्षक व तत्सम पद भरतीसाठी निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून ही प्रक्रिया टिसीएस या संगणक क्षेत्रातील तज्ञ कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. टिसीएस मार्फत राबविली जाणारी वनविभागाची ही पदभरती प्रक्रिया संपूर्णपणे संगणकीकृत असून या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपास अजीबात वाव नाही, हे युवकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. उमेदवारांना भरतीसाठी निहित पद्धतीने सर्व परीक्षा आणि मुलाखती पार पाडणे बंधनकारक आहे, अशी माहीतीही वनविभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Jailer Trailer Launch: रजनीकांतच्या ‘जेलर’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, ‘थलैवा’च्या जबरदस्त अॅक्शनने मन जिंकली 

वन विभागाच्या पद भारतीत नोकरी लावून देतो असे सांगून, काही तोतया व्यक्ती आपण अमुक तमुक अधिकारी आहोत किंवा कुणाचे तरी नातेवाईक आहोत असे भासवून उमेदवारांशी संपर्क साधत असल्याच्या तक्रारी दूरध्वनीद्वारे प्राप्त झाल्या आहेत. त्याची उच्च पातळीवरून तातडीने दखल घेतली गेली आहे. यासंदर्भात युवकांनी सावध राहावे.   मानवी हस्तक्षेपास वाव नसलेल्या या भरती प्रक्रियेत कुणीही अश्या प्रकारे वन विभागात नोकरी लावून देतो असे सांगत असेल तर तातडीने स्थानिक जिल्हा पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून त्याची तक्रार दाखल करावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube