Maharashtra Politics: ठाकरेंकडून शिंदेंची दगडाशी तुलना; म्हणाले, माझ्या भात्यात…

Maharashtra Politics: ठाकरेंकडून शिंदेंची दगडाशी तुलना; म्हणाले, माझ्या भात्यात…

Maharashtra Politics: शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर (Shinde group) जोरदार टीका केली आहे. काही काळासाठी जरी त्यांनी धनुष्यबाण चोरलं असलं तरी प्रभू राम माझ्याजवळ आहेत. त्यावेळी प्रभू रामाचं नाव लिहून दगड तरंगत होती, आता राजकारणात प्रभू रामाचं नाव घेऊन ते तरंगत आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) लगावला. उद्धव ठाकरे रामटेकवरून भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.

एका दृष्टीने बघितल, तर असं कुणीतरी कुणासाठीतरी इतके किलोमीटर पायपीट करत येणं या काळात अवघड नाही, अशक्य गोष्ट आहे. तुम्हाला मातोश्रीमध्ये यावं आणि माझ्याबरोबर उभं राहावं असं वाटणं हा मी रामाचा आशीर्वाद मानतो. रामटेकमधून निघून तुम्ही बरोबर राम नवमी दिवशीच इथे पोहोचलात. काही जणांनी धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभूराम माझ्याबरोबर आहेत”, असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला.

ज्या हिंमतीनं रामटेक ते इथपर्यंत पायी येणं ही हिंमत आहे. ही जिद्द तुमच्यात होती. तुम्ही सगळे सोबत आहात हीच माझी ताकद आहे. धनुष्यबाण जरी कागदावरचा नेला असला, तरी देखील धनुष्यबाण हे माझ्या भात्यात आहेत. हे फक्त बाण नाहीत, तर हे आपल ब्रह्मास्त्र आहे. हे सगळे ब्रह्मास्र माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

Amit Shah ‘खरी शिवसेना आमच्यासोबत, सत्तासंघर्षांवर अमित शाह यांचं मोठं वक्तव्य

लोकशाही वाचवणे हे केवळ माझ्या स्वतःचे काम नाही किंवा माझ्या एकट्यासाठी नाही. आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या पुढील पिढीसाठी देखील आहे. रामसेतू बांधताना वानरसेना तर होतीच, पण खारही होती. तेव्हा तर खारीनंही तिचा वाटा उचलून घेऊन गेले आहेत. आपण सगळे एकत्र आलो, तर लंकादहन करू शकणार नाही का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला.

त्यावेळेस प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन दगड टाकला, तरी तो तरंगत असायचा. आत्ता राजकारणात तेच झालंय. प्रभू रामाचं नाव घेऊन दगड तरंगतायत. तेव्हा दगडांवर पाय ठेवून लंकेत जाण्यासाठी ते तरंगत होते. आता दगडच तरंगतायत आणि दगडच राज्य करत आहेत. मग खऱ्या रामभक्तांनी करायचं काय ? ते रामभक्तांचं काम मला तुमच्याकडून अपेक्षित असलयाचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितल आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube