Supriya Sule on Love Jihad : ‘लव्ह जिहाद म्हणजे काय’ हिंदू जन आक्रोश मोर्चावर सुळेंची प्रतिक्रिया

  • Written By: Published:
Untitled Design (6)

मुंबई : मुंबईत सकल हिंदू समाजाने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा आणि धर्मांतर विरोधी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या मोर्च्यातून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या मला लव्हचा अर्थ कळतो, जिहादचा कळतो परंतु लव्ह जिहादचा अर्थ कळत नाही. असं म्हणत सुप्रिया सुळेंनी हिंदू जन आक्रोश मोर्चावर प्रतिक्रिया दिली

मुंबईतील लिंगायत समाजाच्या मोर्चावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकतर हा मोर्चा सरकार विरोधात आहे. हे असंवेदनशील सरकार आहे, म्हणून लोकांना रस्त्यावर उतरायला लागतं आहे. लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घ्यायला हवे, असं सुळे म्हणाल्या.

शिवसेना चिन्ह

उद्या 30  जानेवारीला शिवसेना पक्षाच्या चिन्हावर सुनावणी होऊ शकते. त्यावर सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या, शिवसेना पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. त्याचा उत्तराधिकारी देखील त्यांनी स्वत: ठरवलेला आहे. त्यामुळे पक्षाचे चिन्ह वेगळ्या कुणाला तरी मिळणे, ते योग्य होणार नाही. ज्यांनी पक्ष काढला, ज्यांनी उत्तराधिकारी ठरवला. त्यांनाच ते चिन्ह मिळाले पाहिजे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

पहाटेचा शपथ विधी

यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या विषयावर बोलणं टाळलं. हा विषय आता खूप वेळा झाला आहे. जयंतराव पाटील देखील यावर बोलले आहेत. त्यामुळे आणखी बोलण्याची गरज नाही, असं त्या म्हणाल्या.

सरकारचे खासदार

केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार आहे हे बघावं लागेल. जूनमध्ये मंदी येणार आहे. असं नारायण राणे हे म्हणत आहेत. त्यामुळे त्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

Tags

follow us