मोठा अनर्थ टळला! मुंबई विमानतळावर प्रवाशांनी भरलेल्या विमानांच्या पंखांची धडक, नेमकं काय घडलं?

Air India-IndiGo planes मुंबई विमानतळावर प्रवाशांनी भरलेल्या विमानांच्या पंखांची धडक झाली मात्र सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

Air India IndiGo Planes

Wings of Air India-IndiGo planes full of passengers collide at Mumbai airport : राज्यामध्ये नुकतच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर विमान प्रवास आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यादरम्यान आता मुंबई विमानतळावरून देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण मुंबई विमानतळावर प्रवाशांनी भरलेल्या विमानांच्या पंखांची धडक झाली मात्र सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगोच्या दोन विमानांचे पंख एकमेकांना धडकले. या दोन्हीही विमानांमध्ये प्रवासी होते. एअर इंडियाचे AI 2732 हे विमान मुंबईहून कोईम्बतूरला जात होते ते धावपट्टीवर थांबले होते त्याचवेळी इंडिगोचे 6E 791 हे विमान हैदराबाद मुंबई विमानतळावर लँड होत होते.

पटेलांनंतर सुनेत्रा पवारही मोदी-शहांच्या भेटीला जाणार, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार?

त्याचवेळी टॅक्सीवे वरून पार्क होण्यासाठी जात असताना या दोन्हीही विमानांची पंख एकमेकांवर घासली. मात्र सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. यावर एअर इंडियाकडून या विमानाचे नुकसान झाल्याचे सांगत खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान तांत्रिक तपासणीसाठी तूर्तास बाहेर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे डीजीसीएने दोन्हीही कंपन्यांना या घटनेचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

follow us