राहुल गांधींच्या प्रेसनंतर ट्विस्ट; महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या मतदार याद्या गायब?; आव्हाडांचा बॉम्ब

  • Written By: Published:
राहुल गांधींच्या प्रेसनंतर ट्विस्ट; महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या मतदार याद्या गायब?; आव्हाडांचा बॉम्ब

MLA Jitendra Awhad On ECI Voter List : मतदार याद्यांच्या चोरीबाबत लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पत्रकार परिषदेनंतर एक मोठा ट्विस्ट आला असून, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या मतदार याद्या गायब केल्याचा गंभीर आरोप शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत आव्हाड यांनी एक्सवर पोस्टदेखील केली आहे.

बदमाशांसारखे वागू नका! कायद्याच्या चौकटीतच काम करा, सुप्रीम कोर्टाने ईडीला झाप झाप झापले

आव्हाडांची पोस्ट नेमकी काय?

चोर चोरी लपवण्यासाठी धावपळ करतोय. राहुल गांधी यांच्या काल झालेल्या पत्रकार परिषदेनंतर लोकांची वाढलेली उत्सुकता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या राज्याच्या मतदार याद्याच वेबसाईटवरून गायब करून टाकल्या. किंबहुना, त्या वेबसाईटपर्यंत आता पोहचताच येत नाही. चोराने चोरी केली आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. आता चोर कुठेही लपला किंवा चोराने कितीही लपवालपवी केली तरी काय फरक पडतो? चोरी तर सिद्ध झालीच आहे.

याचा विचार आता जनतेनेच करावा

निवडणूक मतदान घोटाळा अर्थात वोट चोरी या प्रकरणाची सुरूवात मुख्य निवडणूक आयोगाची निर्मिती कशी व्हावी, या मा. सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आताच्या सत्तारूढ पक्षाने लोकसभेत फिरवून घेतला. मा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, जर निर्वाचन आयोगाला पक्षाभिनिवेशापासून दूर ठेवायचे असेल, पक्षपाती कामापासून त्यांना रोखायचे असेल तर निवडणूक आयुक्तांची निवड करताना जी समिती नियुक्ती केली जाणार आहे; त्या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असावा. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर संविधानाला पायदळी तुडविणाऱ्या या सरकारने सदरचा निर्णय लोकसभेत बदलून घेतला अन् सरन्याधीशांना त्या समितीच्या बाहेर काढून त्या जागी आणखी एक मंत्री असावा, असा निर्णय करून घेतला. त्यामुळेच आपल्याला हवा तो निवडणूक आयुक्त आणता येईल, असा त्यांचा कट होता, अन् झालेही तसेच !

मतांची चोरी नाही, त्यांच्या डोक्यातील चिप अन् हार्ड डिस्क करप्ट; फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

त्यानंतर जे पहिले निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात आले त्यांचे नाव होते राजीव ! हे राजीव भाजपचे बोलके बाहुले म्हणूनच काम करीत होते. या नंतरच महाराष्ट्रातील सरकार पडले. सरकार पाडण्यास जबाबदार असलेल्या अन् पक्ष स्वतःचा असल्याचा दावा करणाऱ्यांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाने पार पाडली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जो घोटाळा झाला, त्यामध्येही निवडणूक आयोगाचाच त्यात सहभाग होता. याची खरी सुरूवात जेव्हा मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून घेतला, तेव्हाच झाली होती. याचाच अर्थ हे प्लॅनिंग कधीपासून झाले अन् हा वोट चोरीचा कट कधीपासून रचला होता, याचा विचार आता जनतेनेच करावा.

महाराष्ट्रात 40 लाख मतदार संशयित – राहुल गांधी

पत्रकार परिषदेत बोलताना काल (दि.7) राहुल गांधींनी म्हटले होते की, एक्झिट पोल काहीतरी वेगळेच सांगतात पण निकाल वेगळाच लागतो. महाराष्ट्रात 40 लाख मतदार संशयित आहे. एक काळ असा होता जेव्हा देशात मतदानासाठी इलेक्टॉनिक मशीन्स नव्हत्या मात्र तरीही संपूर्ण देशात एकाच दिवशी मतदान करत असे पण आज उत्तर प्रदेशात स्वतंत्रपणे मतदान होते. बिहारमध्ये इतर वेळी मतदार होते. मतदान महिने चालते. आम्हाला याची चिंता आहे. महाराष्ट्रात 5 महिन्यांत इतके मतदार जोडले गेले आहेत जे 5 वर्षात जोडले गेले नाहीत. महाराष्ट्रात संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार जोडले गेले आहेत ज्यामुळे अधिक संशय निर्माण होते. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले.

निवडणूक आयोग पुरावे नष्ट करतो, मॅच फिक्स आहे; राहुल गांधींचा हल्लाबोल

निवडणूक आयोग पुरावा देत नाही

निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी देत नाही. सीसीटिव्ही फुटेज देत नाही. महाराष्ट्रात संध्याकाळी 5.30 नंतर बरेच मतदान झाले पण याचा निवडणूक आयोग पुरावे देत नाही. असं देखील माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले. तर कर्नाटक लोकसभा निवडणूकीबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, महादेवपुरा या जागेवर 1 लाख 250 मते चोरीला गेली. 11,965 डुप्लिकेट मतदार होते. 40 हजारांहून अधिक लोकांचे बनावट पत्ते होते. 10 हजारांहून अधिक मतदारांचे एकापेक्षा जास्त पत्ते होते. 4 हजारांहून अधिक जणांचे फोटो चुकीचे होते. 33 हजारांहून अधिक जणांनी फॉर्म 6 चा गैरवापर केला.

बनावट पत्त्यांचे दाखवले पुरावे

पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी बनावट पत्त्यांचे पुरावेदेखील दाखवले, ज्यामध्ये मतदारांसमोरील घराचा पत्ता 0 असा लिहिलेला होता तर, असे अनेक लोक आहे ज्यांचे वडिलांचे नाव hhgassjk होते. तर घर नंबर 35 मधील 80 मतदारांनी एकाच पत्त्यावरुन मतदान केले आणि घर नंबर 791 मधून एकाच पत्तेवर 46 मतदारांनी मतदान केल्याचाही आरोप राहुल गांधींनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube