कुंभमेळ्यासाठी गेलेल्या बोलेरो कारला भीषण अपघात; 10 जणांचा जागीच मृत्यू, 19 जण जखमी

  • Written By: Published:
कुंभमेळ्यासाठी गेलेल्या बोलेरो कारला भीषण अपघात; 10 जणांचा जागीच मृत्यू, 19 जण जखमी

Accident while going to Prayagraj for Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी गेलेल्या बोलेरोची बसला भीषण अपघात होऊन १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये 19 जण जखमी झाले आहेत. जीव गमावलेले सर्व लोक बोलेरो या गाडीतून प्रवास करत होते. या अपघातात बोलेरोचा चक्काचूर झाला. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातून ते महाकुंभासाठी येत होते. (Prayagraj ) प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावरील मेजा परिसरात हा अपघात झाला. बसमध्ये प्रवास करणारे 10 जखमी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील रहिवासी होते. संगम स्नान करून ते वाराणसीला जात होते.

बोलेरो गॅस कटरने कापण्यात आली

यमुनापारचे एसपी विवेक यादव म्हणाले की, सर्व पुरुष बोलेरोमध्ये प्रवास करत होते. त्याचा वेग खूप जास्त होता. बस चालकाने ब्रेक लावला, मात्र समोरून येणारी बोलेरो बसला धडकली. मृत हे कोरबा पास आणि जांजगीर चंपा जिल्ह्यातील रहिवासी होते. दोन कुटुंबातील सदस्य एकत्र आले होते.जखमींना रामनगर सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्वांना स्वरूप राणी रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीसांनी कुटुंबासह महाकुंभात केलं गंगास्नान; पाहा फोटो

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, धडकेचा आवाज ऐकून आम्ही धावत तिथे पोहोचलो. बोलेरोमध्ये मृतदेह अडकल्याचे पाहिले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस गॅस कटर आणि रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले. बोलेरो गॅस कटरने कापण्यात आली. त्यानंतरच मृतदेह बाहेर काढण्यात आले. अनेक मृतदेह विद्रुप झाले होते. बॅगेत सापडलेल्या आधारकार्डवरून पोलिसांनी ईश्वरी प्रसाद जैस्वाल आणि सोमनाथ दारी या दोघांच्या मृतदेहांची ओळख पटवली.

बहुतांश लोक झोपले होते

जखमी भक्त रोडमल यांनी सांगितले की, अपघातावेळी बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश लोक झोपलेले होते. अचानक जोरदार धडक झाली. त्यावेळी मी जागे होऊन बसच्या केबिनमध्ये बसलो होतो. नियंत्रण सुटलेली बोलेरो समोरून बसला धडकली. सुदैवाने मी कसा तरी वाचलो. कोरबा जिल्हाधिकारी अजित बन्सल म्हणाले की, आम्ही प्रयागराज पोलिसांच्या संपर्कात आहोत. एसपींनी तेथील पोलिसांशी चर्चा केली आहे. भाविकांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. त्यांचे कुटुंबीय प्रयागराजला रवाना झाले आहेत. प्रयागराजशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करू.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube