तीन हजार कोटींची संपत्ती सोडून धारण केला भगवा; महाकुंभात व्हायरल होणारे बिजनेसमन बाबा कोण?

तीन हजार कोटींची संपत्ती सोडून धारण केला भगवा; महाकुंभात व्हायरल होणारे बिजनेसमन बाबा कोण?

Businessman Baba in Mahakumbh who leave 3 thousands core property : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ (Mahakumbh) सुरू आहे. प्रयागराजच्या (Prayagraj) महाकुंभमेळ्यातील (Mahakumbh Mela) अनेक गोष्टींची देशभर चर्चा झाली. इथले पवित्र स्नान, इथे नागा साधू, आयआयटीवाले (IIT) बाबा, चावीवाले बाबा अशा अनेकांची चर्चा झाली.त्यात आता आणखी एक बाबा समोर आले आहेत. बिजनेसमन बाबा असं या बाबांचं नाव आहे. तब्बत तीन हजार कोटींची संपत्ती सोडून थेट भगवे वस्त्र धारण करणारे हे महाकुंभात व्हायरल होणारे बिजनेसमन बाबा कोण? जाणून घेऊ…

चार दिवसांनंतर बदलणार फास्टॅगचे नियम; नाहीतर भरावा लागेल दुप्पट टोल

हे बिजनेसमन बाबा इतर बाबांपेक्षा वेगळे आहेत. कारण त्यांनी तब्बत तीन हजार कोटींची संपत्ती सोडून थेट भगवे वस्त्र धारण केले आहे. त्यामुळे सध्या सोशल मिडीयावर त्यांच्या कहाण्या खुप व्हायरल होत आहेत. तर स्वत: बाबांनी देखील त्यांचा जीवन प्रवास सांगितला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, सर्व प्रकरचे सुखसोयी उपभोगून झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की, ही संपत्ती देखील मनुष्याला समाधान देत नाही.

रिक्षावाला आला रिक्षाचालकांच्या मदतीला ! 65 वर्षांवरील रिक्षाचालकांना 10 हजार देणार, मंत्री सरनाईकांची घोषणा

हा विचार डोक्यात आल्यानंतर मी भगवे वस्त्र धारण करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे या बाबांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यात काहींनी बाबांच्या या निर्णयाचं कौतुक केलं तर काहींनी त्यांना सल्ले देखील दिले आहेत. लोक म्हणत आहेत की, या बाबांनी गरीबी पाहिली नाही. त्यामुळे त्यांनी ही सर्व संपत्ती सोडली. नाही तर त्यांना गरिबीतून बाहेर आल्यानंतर या संपत्तीची किंमत कळाली असती. असंही काही जण म्हणाले आहेत.

अयुष्मान खुराना WPL 2025 च्या उद्घाटन सोहळ्यात धमाकेदार परफॉर्मन्ससाठी सज्ज

दरम्यान महाकुंभात अनेक बाबा आले पण सोशल मिडियावर सगळ्यात जास्त मार्केट खाल्लं ते मोनालिसा भोसलेने (monalisa bhosle). घारे डोळे, त्यावर काळेभोर काजळ आणि मनमोहक चेहरा अशी मोनालिसा मागच्या आठवड्यापासून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आता याच व्हायरल गर्लने प्रयागराज आणि महाकुंभमेळा सोडल्याची चर्चा आहे. प्रयागराज सोडण्यापूर्वी तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आवाहन केलं होतं. पण या आवाहनाचा काहीही उपयोग झाला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube