इंदूरमधील मंदिरात विहिरीचे छत कोसळल्यानं 13 भाविकांचा मृत्यू

इंदूरमधील मंदिरात विहिरीचे छत कोसळल्यानं 13 भाविकांचा मृत्यू

इंदूर : आज देशभरात सगळीकडे रामनवमीचा उत्साह असतांना इंदरूमध्ये मात्र, एक मोठी दु:खद घटना घडली आहे. इंदूरमध्ये आज बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण 13 भाविकांचा मृत्यू झाला असून कित्येक जण हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमधील पटलेनगरमधील मधील बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता. या उत्सवासाठी अनेक भाविक मंदिरात दर्शनासाठी आले होते. या मंदिरात एक मोठी विहिर आहे. यावेळी मंदिरात यज्ञ सुरू होता. त्यावेळी विहिरीच्या छतावर अनेकजण बसले होते. मात्र, भाविकांचे वजन जास्त असल्यानं छत निखळले आणि दुर्घटना घडली. दरम्यान, अचानक विहिरीचं छत कोसळल्यानं मोठा अपघात झाला.

दुःख बाजूला सारत बापटांचे कार्यकर्ते लागले कामाला..
25 ते 30 भाविक हे विहिरीत कोसळले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, कलेक्टर, आणि इतर प्रशासकीय अधिकारी दाखल झाले होते. त्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. पोलिसांनी आणि भाविकांनी रस्सीच्या मदतीनं जखमी भाविकांना विहिरीतून बाहेर काढलं. मात्र, या अपघातात एकूण 13 जणाचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चिमुकल्या मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. 13 मृतांपैकी 13 महिला आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत आणखी काही लोक जखमी आणि मृत्यू होण्याची शक्यता आहे.

मृतांमध्ये आतापर्यंत या लोकांची ओळख पटली
भारती – (50) पति परमानंद, स्नेह नगर
मधु – (48) पति राजेश, सर्वोदय नगर
दक्षा – (55) पति लक्ष्मीकांत, पटेल नगर
जयवंती – (84) पति परमानंद, स्नेह नगर
लक्ष्मी – (70) पति रातीलाल, पटेल नगर
इंद्र कुमार – (47) पिता थावर दास, साधु वैष्णवी नगर
मनीषा – (23) पति आकाश, साधु वैष्णवी नगर
कनक पटेल (32)
पुष्पा पटेल (49)

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या घटनेची दखल घेतली असून त्यांनी कलेक्टर यांना जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत देण्याचे आदेश दिला.
चौहान यांनी मृतांना प्रत्येक 5-5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube