Atiq Ahmed : अतिक जेलमध्ये असतांनाही पत्नीची भरमसाठ कमाई, शाहीनबागमधील मालमत्तांतून महिन्याला मिळायचे 15 लाख

Atiq Ahmed : अतिक जेलमध्ये असतांनाही पत्नीची भरमसाठ कमाई, शाहीनबागमधील मालमत्तांतून महिन्याला मिळायचे 15 लाख

15 lakh was collected every month from Shaheen Bagh : पाच दिवसांपूर्वी कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळं यूपीतील अतिकच्या दहशतीचा चॅप्रटर द एन्ड झाला आहे. अतिकच्या हत्येच्या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं अतिकच्या हत्येची ही घटना देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, अतिकच्या मृत्यूनंतर त्याच्या कारनाम्यांच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत.

गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येप्रकरणी रोज काही ना काही नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आत्ता पुन्हा एकदा नवा खुलासा समोर आला आहे. या खुलाशात अतिक टोळीच्या वसुलीचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीच्या शाहीनबागमधील मालमत्तांमधून महिन्याला 15 लाख रुपयांची वसूल होत होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. वसुलीची ही रक्कम अतिकची पत्नी शाइस्ता परवीनला दर महिन्याला पाठवली जायची.

हा खुलासा शहिद नावाच्या एका तरुणाने केला आहे, ज्याला दिल्लीतून अतिकचा फरार मुलगा असद अहमद याला आश्रय दिल्याच्या आरोपावरून यूपी एसटीएफने नुकतेच उचलले होते. शहीदने स्वतः सांगितले की, तो स्वत: दर महिन्याला ही वसुलीची रक्कम शाईस्ताला देत असे. शहीदच्या माहितीवरूनच यूपी एसटीएफला असदच्या नवीन मोबाईल नंबरची माहिती मिळाली होती. त्यानंतर झाशी चकमकीत असदला यूपी एसटीएफने ठार केले.

महिला आयोगाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंना आमंत्रण का? चाकणकरांनी सांगितलं खरं कारण…

दिल्लीच्या शाहीन बागेतील मालमत्तांमधून दर महिन्याला १५ लाख रुपये वसुली करून जमा केले जात असल्याचे शहीदने यूपी एसटीएफला सांगितले. ही रक्कम शाइस्ता परवीनला पाठवली जात होती. असदला आश्रय देण्यासाठी यापूर्वी उचलण्यात आलेल्या तीन तरुणांनीही याला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे उमेश पाल खून प्रकरणात अतिकची पत्नी शाइस्ता परवीन हिच्यावर ५० हजारांचे बक्षीस असून ती सतत फरार आहे. यूपी एसटीएफच्या अनेक पथके शाईस्ताच्या अटकेसाठी सातत्याने छापे टाकत आहेत.

शनिवारी (15 एप्रिल) रोजी रात्री कॅल्विन हॉस्पिटलमध्ये आलेले अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची तीन हल्लेखोर तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तेव्हापासून संपूर्ण शहरातील परिस्थिती संवेदनशील आहे. दरम्यान, पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी पोलीस करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube