महिला आयोगाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंना आमंत्रण का? चाकणकरांनी सांगितलं खरं कारण…
राज्यात काही महिन्यापूर्वी सत्तांतर झालं. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचं सरकार आलं. पण महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर मात्र कायम आहेत. त्यात काही दिवसापूर्वी त्यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिले होते.
त्यावरून त्या राष्ट्रवादी पक्ष सोडणार, अश्या चर्चा रंगल्या होत्या. या प्रश्नांवर रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलच सोबत त्यांनी महिला आयोगाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना का आमंत्रण दिल, याचं कारणही सांगितलं. ‘लेट्सअप सभा’ या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी चाकणकर (Rupali Chakankar) यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमात चाकणकर यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली.
Heatwave : राज्यात उकाड्याने नागरिक त्रस्त, वीजेच्या मागणीत प्रचंड वाढ
राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर महिला आयोगाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिले होते. त्यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “देशात सर्वच राज्यात आजवरची जी प्रथा आहे, त्यानुसार सर्वच ठिकाणी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात. देशातील इतर राज्यात देखील हीच परंपरा आहे.”
या परंपरेनुसारच आम्ही (महिला आयोग) मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिले होते. गेल्या वर्षी देखील तत्कालीन मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिले होते. पण तेव्हा त्यांची तब्येत खराब असल्यामुळे नंतर शरद पवार साहेबांना बोलवण्यात आले होते. यावर्षीही एकनाथ शिंदे यांनी आम्हाला वेळ दिली होती. पण नंतर त्यांना राजस्थानमध्ये काही कार्यक्रम आल्यामुळे त्यांच्या जागी मंत्री दादाजी भुसे आले होते. अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
Ajit Pawar : ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील आपत्ती सरकार निर्मित, अजित पवारांचं सरकारला पत्र
दादा भुसे यांच्याकडून आश्वासन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाला आले नसले तरी त्यांच्या जागी मंत्री दादाजी भुसे आले होते. त्यांनी या कार्यक्रमात महिला आयोगाच्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी आम्हाला खात्री दिली की पक्ष वेगळा असला तरी मंत्रिमंडळातील सर्व भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. शिवाय महिला आयोगाच्या संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं देखील त्यांनी आश्वासन दिल आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
उत्तम कारभार केला
महिला आयोगाच्या आतापर्यंतच्या दीड वर्षांच्या कार्यकाळात अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. विशेष म्हणजे, मी अध्यक्ष झाल्यानंतर माझ्याकडे पहिली तक्रार पुरुषांची आली होती. आयोगाच्या दीड वर्षांच्या कार्यकाळात सतत महिलांना न्याय देण्याचीच भूमिका स्वीकारली. या पदाचा कार्यभार मी उत्तमपणे सांभाळला असेही चाकणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.