उत्तरकाशीत भाविकांवर काळाचा घाला! बस दरीत कोसळल्यानं 8 ठार, 27 जखमी

उत्तरकाशीत भाविकांवर काळाचा घाला! बस दरीत कोसळल्यानं 8 ठार, 27 जखमी

Uttarakhand Bus Accident :  उत्तराखंडच्या उत्तराकाशीमध्ये भीषण अपघाताची एक दुर्घटना घडली आहे. गंगोत्री धामहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. 35 भाविकांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात 7 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 28 जण जखमी झाले असून त्यांना रेस्क्यू करण्यात आले आहे. उत्तरकाशी गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. बसमध्ये गुजरातचे प्रवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक (यूके 07 8585) गंगोत्रीहून उत्तरकाशीच्या दिशेने जात होती. गंगोत्री धामहून परतणारी ही बस रविवारी एका खोल दरीत नियंत्रण सुटल्याने कोसळली. दुपारी चार-साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. बसमध्ये एकूण 35 जण होते. या अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचताच बचावकार्य पथकाने सुरू केलं. जखमींना 108 रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (डीडीएमओ), देवेंद्र पटवाल यांनी सांगितले की, पोलीस आणि इतर पथकांना अपघातस्थळी दाखल होत बचावकार्य केलं. मात्र, या अपघातात सात ठार झाले. उर्वरित जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. जखमींची तब्येत कमालीची गंभीर असल्याचं ते म्हणाले. पटवाल पुढे म्हणाले की, मृत आणि जखमींची ओळख पटवली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, बस गुजरातमधील यात्रेकरूंना घेऊन जात होती, असं त्यांनी सांगितलं.

Air India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांची बंपर ओपनिंग्ज, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे प्रभारी मंत्री प्रेमचंद्र अग्रवाल आणि अतिरिक्त मुख्य सचिवांना या घटनेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनी स्थानिक प्रशासनाला तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मदतकार्यासाठी गरज पडल्यास डेहराडूनमध्ये हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यास सांगण्यात आल्याचे सीएम धामी यांनी सांगितलं आहे. शोकाकुल कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, आणि सर्व जखमी लवकर बरे व्हावेत, अशी त्यांनी कामना केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube