ब्रेकिंग : नालंदा येथील शीतला माता मंदिरात चेंगराचेंगरी; 8 महिला भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

stampede At temple In Bihar's Nalanda बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील शितला मातेच्या मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.

  • Written By: Published:
ब्रेकिंग : नालंदा येथील शीतला माता मंदिरात पूजेदरम्यान चेंगराचेंगरी; 8 महिलांचा मृत्यू, अनेक जखमी

8 women killed in stampede at temple in Bihar’s Nalanda : बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील शीतला मंदिरात मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. धार्मिक मेळाव्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 8 महिलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे तर, अनेक भाविक जखमी झाले आहेत. सध्या या ठिकाणी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नालंदा जिल्ह्यात असलेल्या दीपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माघरा येथे प्रसिद्ध शीतला मंदिर आहे. दर मंगळवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे सकाळपासूनच मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमले होते.  त्याचवेळी पूजेदरम्यान अचानक धक्काबुक्की सुरू झाली आणि चेंगराचेंगरीत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

बचाव आणि मदतकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना तात्काळ नालंदाच्या सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर प्रशासनाने मंदिर परिसर पूर्णपणे रिकामा केला असून, एसडीएम आणि इतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहे. 

नितीशकुमार यांच्याकडून मदत जाहीर

शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुःख व्यक्त केले असून, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 6 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येकी 4 लाख रुपये आणि मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जाणार आहेत.

 

follow us