आदित्य ठाकरे दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या भेटीस, राजकीय चर्चांना उधाण

Untitled Design   2023 05 14T144323.253

Aaditya Thackeray Meets Arvind Kejariwal : नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. तर काँग्रेसने या निवडणुकीत मुसंडी मारली. दरम्यान आगामी निवडणुकांसाठी देखील विरोधकांकडून अशीच रणनीती आखली जात आहे. यातच उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज दिल्ली दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यांच्या या अचानक भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

2024 च्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून भाजपला पर्याय देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महाराष्ट्रात येत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यांनतर आदित्य ठाकरे हे देखील आज दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. आदित्य यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

भेटीनंतर केजरीवालांनी केलं ट्विट
आदित्य ठाकरे यांच्या भेटीबाबत अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. आज माझ्या निवासस्थानी आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी देशात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आम्ही चर्चा केली, असं केजरीवाल म्हंटले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी मुंबईमध्ये मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

Video : कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? दोन नव्हे ‘ही’ चार नावे चर्चेत; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने खळबळ

काँग्रेसच्या कर्नाटक विजयानंतर विरोधक अधिक सक्रिय झाल्याचं पहायला मिळत आहे. काल ठाकरे गटाची बैठक झाली तर आज महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. दुसरीकडे भाजपविरोधात विरोधकांचा मजबूत पर्याय उभा करण्यासाठी नितीश कुमार हे पुढाकार घेताना दिसून येत आहेत.

Tags

follow us