दाट धुक्यामुळे भीषण अपघात : तब्बल 100 वहाने एकमेकांवर आदळली, अनेक जण जखमी

दाट धुक्यामुळे भीषण अपघात : तब्बल 100 वहाने एकमेकांवर आदळली, अनेक जण जखमी

लुधियाना : पंजाबमधील Punjab) लुधियानामध्ये आज (13 नोव्हेंबर) मोठी दुर्घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर (Amritsar-Delhi National Highway) लुधियानाजवळील खन्ना शहरात सुमारे 100 वाहने एकमेंकावर आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. (About 100 vehicles collided in Khanna town near Ludhiana on Amritsar-Delhi National Highway due to dense fog)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दाट धुक्यामुळे अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर लुधियानाजवळील खन्ना शहराजवळ हा अपघात झाला.धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. या अपघातात 13 किलोमीटरवरील सुमारे 100 वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींना खन्ना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कट्टरपंथी मतैई संघटनांवर 5 वर्षांची बंदी, मणिपूर हिंसाचारप्रकरणी केंद्राची कारवाई

बसपासून ते ट्रक आणि कार एकमेकांवर आदळल्या

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात बस, ट्रक आणि कार एकमेकांवर आदळल्या आहेत. बसमध्ये प्रवास करणाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात मोटारींचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही बस आणि ट्रकच्या पुढील भागाचे पूर्ण नुकसान झाले आहे.

खराब झालेली वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली

पोलीस उपअधीक्षक राजेश शर्मा यांनी सांगितले की, महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे, काही खराब झालेली वाहनेही रस्त्यावरून हटवण्यात आली आहेत. अपघातात दोन राज्य परिवहन बस आणि एका ट्रकचा समावेश आहे. कोणती वाहने प्रथम एकमेकांवर आदळली हे शोधणे फार कठीण आहे, कारण अपघातानंतर काही लोक त्यांच्या खराब झालेल्या वाहनांसह घटनास्थळावरून निघून गेले.

Delhi Pollution : राजधानी दिल्लीत धुराचं साम्राज्य; वाहने, शाळांसह लाकूड जाळण्यावर बंदी…

दिल्लीत बिकट प्रदुषण :

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह देशभरात प्रदुषणाचं सावट आहे. हवा दुषित झाल्याने राजधानी दिल्लीत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. दिल्लीत वाहनांना बंदीसह शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. एवढचं नाही तर लाकूड जाळण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत दिल्लीकरांना आत ग्रेप – 4 च्या निर्बंधांना सामोरं जावं लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube