महिलांसाठी येणार ‘अच्छे दिन’, Budget 2024 मध्ये मोदी सरकार करणार मोठा धमाका

महिलांसाठी येणार ‘अच्छे दिन’, Budget 2024 मध्ये मोदी सरकार करणार मोठा धमाका

Budget 2024 : लोकसभा निवडणुकीत एनडीएला (NDA) मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) संसदेत अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार यावेळी मोदी सरकार (Modi Government) या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा करणार आहे.

यामध्ये गॅसच्या दरात कपातीपासून ते सबसिडीपर्यंत महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच या अर्थसंकल्पात महिलांसाठी नवीन योजनांची देखील घोषणा होऊ शकते आणि लखपती दीदी योजनेमध्ये काही बदल होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आतपर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार या अर्थसंकल्पात महिलांना आकर्षित करण्यासाठी नवीन योजना जाहीर करणार आहे. याच बरोबर महिला व्यावसायिकांना करमध्ये देखील मोठी सवलत देण्याचा केंद्र सरकारकडून विचार होत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

तर दुसरीकडे केंद्र सरकारची लोकप्रिय योजना लखपती दीदीमध्ये (Lakhpati Didi) देखील मोठा बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या योजनेची घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम बजेटमध्ये केली होती. या योजनेत महिलांना वर्षाला 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपये कमवण्याची संधी उपलब्ध असते. मात्र आता या योजनेत मोठा बदल होणार असल्याची शक्यता आहे. ज्यामुळे या योजनेत महिलांना जास्त पैसे कमवण्याची संधी मिळू शकते.

तसेच केंद्र सरकार या अर्थसंकल्पात व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी देखील मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये व्यवसायिक महिलांना कमी व्याजदरात बँकेतून कर्ज उपलब्ध करू देण्यात येणार आहे तसेच या महिलांना कर सवलत देखील मिळणार असल्याची शक्यता आहे. आरोग्यासंबंधित देखील सरकार या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करू शकते. याच बरोबर सरकार गॅसच्या दरात कपात करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

जमत नसेल तर राजीनामा द्या, मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण करू नका, वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

तर आयुष्यमान भारत योजनेतंर्गत केंद्र सरकार विमा रक्कम वाढण्याचा निर्णय देखील घेणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे 23 जुलै रोजी केंद्र अर्थमंत्री निर्मला सीतारमण कोणत्या कोणत्या घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज