बजरंग दलावर कारवाई? काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी उलगडून सांगितलं…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात संघटनेवर कारवाई नाही तर कायद्यांतर्गत निर्णायक कारवाईचे आश्वासन देण्यात आलं असल्याचं काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलावर कारवाईची घोषणा केली. त्यावरुन कर्नाटकात वातावरण चांगलंच पेटल्याचं दिसून येतंय.
‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत
पी. चिदंबरम म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात संघटनेवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं नाही तर ज्या संघटना देशात द्वेष पसरवतात त्या सर्व संघटनांना हा इशारा असल्याचं म्हटलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच काँग्रेस बजरंग दल संघटनेवर कारवाईची घोषणा केल्याचा प्रचार भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय. यावरुन आता कर्नाटकात चांगलाचं वाद पेटला असल्याचं दिसतंय.
तामिळनाडूत ‘द केरळ स्टोरी’ बॉयकॉट, मल्टिप्लेक्स संघटनांचा निर्णय
या वादावरुन काँग्रेस नेते चिदंबरम यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले तुम्ही जाहीरनाम्यातील दोन वाक्ये पुन्हा वाचा. त्यामध्ये दोन संघटनांचे संदर्भ आहेत जे अत्यंत द्वेषयुक्त भाषण करतात. देशात द्वेष पसरवणाऱ्या सर्व संघटनांना काँग्रेसने हा इशारा दिला आहे.
दरम्यान, काँग्रेसने कायद्यानुसार निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. कायद्यानुसार एखाद्या संस्थेवर बंदी घालणे ही न्यायालयीन प्रक्रिया असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. सध्या कर्नाटकात भाजप सत्तेत असून भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. येत्या 10 मे रोजी कर्नाटकात मतदान पार पडणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.