मुख्यमंत्री झाल्यानंतर थलपती विजय यांची अभिनेते कमल हसन यांनी घेतली भेट, केल्या ‘या’ 6 मागण्या

सुप्रसिद्ध बॉलिवूड आणि साऊथ अभिनेते कमल हासन यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर दोन फोटो शेअर केले, त्यात त्यांनी थलापती विजयची भेट घेतल्याचे दिसून आले.

News Photo   2026 05 17T152742.260

तमिळनाडूच्या राजकिय इतिहासात (Vijay) काही दिवसांपूर्वी मोठ बदल घडले. बरीच वर्षे सत्तेत असलेले दोन पक्ष पराभूत होऊन तिथे सुपरस्टार थलापती विजय जिंकले आणि त्यांनी तमिळनाडूच्या राजकिय विश्वात सत्ता स्थापन केली. या सत्तापालटासाठी त्यांना सुद्धा बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले होते. पण शेवटी विजय हा विजयचाच झाला. शनिवारी, सुप्रसिद्ध बॉलिवूड आणि साऊथ अभिनेते कमल हासन यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर दोन फोटो शेअर केले, त्यात त्यांनी थलापती विजयची भेट घेतल्याचे दिसून आले.

विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ही भेट घेतली गेली. आपल्या फेसबुक पेजवर, कमल यांनी नमूद केले की, तामिळ चित्रपटसृष्टीला आवश्यक तो आधार पुरवण्याच्या उद्देशाने त्यांनी विजय यांच्यासमोर सहा विशिष्ट मागण्या मांडल्या होत्या. काही तासांनंतर, कमल यांनी एक अधिकृत निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्यांनी या मागण्यांची सविस्तर माहिती दिली.

‘कोणी डॉक्टर तर कोणी अभिनेता’; मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळात या चेहऱ्यांचा समावेश

या फोटोंसोबत तामिळ भाषेत कमल हासन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, आज, मी तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री, माझे बंधू, विजय यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना माझ्या शुभेच्छा दिल्या. तामिळनाडूच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या त्यांच्या अनेक महत्त्वाकांक्षा त्यांनी माझ्याशी शेअर केल्या. आमच्या भेटीदरम्यान त्यांनी माझ्याकरीता दाखवलेली नम्रता आणि स्नेह पाहून माझे मन अभिमानाने भरून आले.

कमल हासन यांच्या विजय यांच्यासमोर 6 मागण्या

1. तामिळनाडू सरकारद्वारे एका OTT प्लॅटफॉर्मची सुरुवात:

एक असं व्यासपीठ जिथे तामिळ प्रेक्षक तामिळ चित्रपट, स्वतंत्र चित्रपट आणि माहितीपट परवडणाऱ्या व सवलतीच्या दरात पाहू शकतील.

2. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे आकारला जाणारा 4% मनोरंजन कर रद्द करणे.

3. एक सक्षम ‘पायरेसी-विरोधी पथक’ (anti-piracy team) स्थापन करणं. तामिळनाडू पोलीस दलाच्या सायबर गुन्हे विभागांतर्गत पायरेसी-विरोधी अंमलबजावणी कक्षाची स्थापना करणे.

4. संपूर्ण तामिळनाडूमध्ये सर्व चित्रपटांसाठी दररोज 5 शोची परवानगी देणे. यामुळे चित्रपटगृहांच्या महसुलात वाढ होईल आणि चित्रपट रिलीज क्षेत्राला बळ मिळेल.

5. तामिळनाडूमध्ये प्रदर्शित होणाऱ्या सर्व चित्रपटांसाठी 8 आठवड्यांचा अनिवार्य ‘OTT विंडो’ (OTT प्रदर्शनासाठी निश्चित कालावधी) ठेवणे.

6.चित्रपट निर्मिती प्रोत्साहन योजनेची सुरुवात करणे:

ज्या भारतीय चित्रपटांचे 50 टक्क्यांहून अधिक चित्रीकरण तामिळनाडूमध्ये पूर्ण होते, अशा चित्रपटांना त्यांच्या एकूण बजेटच्या 10 टक्क्यांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देणे.

Tags

follow us