महाराष्ट्रासाठी महत्वाची बातमी; अॅमेझॉन ८.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार, मंत्री वैष्णव यांची घोषणा

Amazon Web Services Project in Maharashtra : महाराष्ट्रासाठी महत्वाची बातमी आहे. (Project) अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस महाराष्ट्रामध्ये ८.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा माहिती– तंत्रज्ञान व रेल्वे खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली.
थांबू नका लवकरच मुले जन्माला घाला तामिळनाडूच्या मु्ख्यमंत्र्यांचं फर्मान, बैठकच बोलावली
‘अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’चे भारत आणि दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष संदीप दत्ता यांनी आज माहिती तंत्रज्ञान व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि त्यांना या गुंतवणुकीची माहिती दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना वैष्णव यांनी या गुंतवणुकीचे स्वागत करताना ‘अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’तर्फे देशात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले जाईल असा विश्वास व्यक्त केला.
ते म्हणाले की ‘अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’च्या शिष्टमंडळाने महाराष्ट्रात २०२९-३० पर्यंत ८.२ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना सादर केली. या गुंतवणुकीतून देशात आणि महाराष्ट्रात नवे रोजगार वाढतील असा विश्वास मंत्री वैष्णव यांनी व्यक्त केला.