मणिपूरमध्ये हिंसाचार का होतो? गृहमंत्र्यांनी सगळा घटनाक्रमच सांगितला, कॉंग्रेसवरही जोरदार टीका

मणिपूरमध्ये हिंसाचार का होतो? गृहमंत्र्यांनी सगळा घटनाक्रमच सांगितला, कॉंग्रेसवरही जोरदार टीका

Amit Shah on Manipur violence : मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. लोकसभेत त्यावर चर्चा सुरू झाली आहे. आसामचे खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आणि सरकारला धारेवर धरले. त्यानंतर आता भाजपनेही आक्रमक भूमिका घेत विरोधकांना सडेतोड उत्तरं दिली. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या मणिपूरच्या मुद्द्यावर बोलतांना मणिपूरमधील हिंसाचारामागील कारण सांगितले. (amit shah critisize congress over manipur violence they said origin of violence)

आज सभागृहात बोलतांना अमित शाह म्हणाले, मणिपूरच्या मुद्द्याकडे आम्ही दुर्लक्ष करत नाही. मात्र, तुम्हीच गृहमंत्र्यांना बोलू देत नाही. या मुद्दावरून राजकारण केल्या जातं. आम्हाला चर्चा नको आहे, असं बोलल्या जातं. मात्र, चर्चा कण्यासाठी आम्हीच सभापतींना पत्र लिहिलं होत. मणिपूरमध्ये 2021 मध्ये वातावरण बिघडायला सुरूवात झाली. 2021 मध्ये म्यानमारमध्ये सत्तापरिवर्तन झाले. तिथं लष्करी राजवट आली. म्हणूनच कुकी डेमोक्रेटीक संघटना लोकशाहीसाठी आंदोलन करून लागली. मात्र, लष्करी राजवटीने कुकी समाजावर दबाव आणला. त्यामुळं कुकी समाजाचे लोक भारतात येऊ लागले. हजारो कुकी मणिपूर आणि मिझोरामच्या जंगलात स्थायिक झाले. यामुळे मणिपूरच्या इतर भागात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. यावर राजकारण करणं लज्जास्पद असल्याचं शाह म्हणाले.

ते म्हणाले, ही घुसखोरी थांबवण्यासाठी आम्ही भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घातलं आतापर्यंत 10 किलोमीटरपर्यंत कुंपण घातले आहे. 60 किमी कुंपणाचे काम सुरू आहे. आम्हाला मणिपूर हिंचाचारवरून प्रश्न विचारणाऱ्यांनी 2014 पर्यंत कुंपण का लावले नाही? असा सवाल शाह यांनी केला.

शाह म्हणाले, कुकी समुदाय मणिपूरच्या डोंगराळ भागात राहतो तर मेतैई लोक पठारावर राहतात. पण, म्यानमारमधून होणाऱ्या घुसखोरीमुळे तेथील मेतैई लोकांना भीती वाटू लागली. आरक्षण आणि नोकऱ्यांवर परिणाम होईल, अशी भीती त्यांना आहे. आम्ही 2023 पासून निर्वासितांची नोंद ठेवण्यास सुरुवात केली. मात्र, तरीही मेतैईमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, अफवा पसरल्या की निर्वासितांनी उभारलेली वसाहत गाव म्हणून घोषित करण्यात आली आहे. ही अफवा राज्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर हायकोर्टाचा निकाल आहे. यामुळं आगीत इंधन ओतल्या गेलं. मिरवणूक निघाली. यावर दगडफेक झाली. त्यानंतर काय झालं हे सर्वांनी पाहिलं.

यावेळी बोलतांना त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, पीव्ही नरसिंहराव 1993 मध्ये पंतप्रधान होते. मणिपूरमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी नागा-कुकी संघर्ष झाला होता. 700 लोक मरण पावले. 2004 मध्ये मनमोहन सिंग सरकारमध्ये असताना 1700 हून अधिक लोकांचे एन्काऊंटर झाले. तरीही पंतप्रधान तिकडे गेले नाहीत.

मुख्यमंत्र्यांचे सहकार्य, मग राष्ट्रपती राजवट का?
रात्री मोदीजींनी फोन करून मला उठवले. आम्ही बरेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केले. तेथील अधिकारी बदलले. आम्ही डीजीपी बदलले, आम्ही मुख्य सचिव बदलले, पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे तिथे राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही. राज्य सरकारने सहकार्य न केल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube