‘काँग्रेसचा निर्णय देशविरोधी’; वंदे मातरमच्या मुद्द्यावर अमित शाहांचा राहुल गांधींवर निशाणा

वंदे मातरमच्या मुद्द्यावर अमित शाह यांनी काँग्रेसवर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप करत या निर्णयाला संसदेत विरोध करण्याची भूमिका स्पष्ट केली.

Amit Shah on Vande Mataram

Amit Shah on Vande Mataram : वंदे मातरमच्या गायनावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस कार्यसमितीने 1937 च्या ठरावाचा आधार घेत वंदे मातरमची (Vande Mataram) केवळ दोन कडवी गाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करत शाह यांनी काँग्रेसचा हा निर्णय “आश्चर्यजनक आणि देशविरोधी” असल्याचे म्हटले. भाजपाच्या सोशल मीडिया अकाऊंवरून अमित शहांनी त्यांचे हे मत व्यक्त केले.

अमित ठाकरेंचा ABVPला इशारा; म्हणाले, ‘मुलींवर हात टाकलात तर मार खाणार’

अमित शाह यांच्या मते, 1937 मध्ये काँग्रेसने मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी म्हणजे मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी किंवा त्यांच्या मतांना आकर्षित करण्यासाठी वंदे मातरमचे विभाजन केले. याच निर्णयामुळे देशाच्या फाळणीची आणि द्विराष्ट्र सिद्धांताला बळ मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली, असा आरोप त्यांनी केला.

‘वंदे मातरमचे दोन तुकडे करून फाळणीची बीजे रोवली’

शाह यांनी दावा केला की, काँग्रेसने 1937 मध्ये वंदे मातरमच्या केवळ काही भागाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, या निर्णयातून देशाच्या फाळणीची बीजे रोवली गेली आणि पुढे पाकिस्तानची निर्मिती झाली.

ललित प्रभाकर- प्राजक्ता माळी पुन्हा एकत्र ; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’च्या वाढवली उत्सुकता

वंदे मातरमच्या रचनेला 150 वर्षे पूर्ण होत असताना या ऐतिहासिक गीताचे पूर्ण स्वरूप पुन्हा स्वीकारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शाह यांनी सांगितले. सरकारी कार्यक्रमांमध्ये संपूर्ण वंदे मातरम गाण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याला कायदेशीर स्वरूपही देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

‘काँग्रेसचा निर्णय तुष्टीकरणाच्या राजकारणाचा पुरावा’

काँग्रेसने या निर्णयाची अवहेलना करण्याची भूमिका घेतल्याचा आरोप करत अमित शाह म्हणाले की, हा निर्णय त्यांच्या “घोर तुष्टीकरणाच्या नीतीची” पुष्टी करणारा आहे.

‘17 सप्टेंबरनंतर काय होतं ते बघा’; संजय राऊत आक्रमक, फडणवीस-शिंदेंवर गंभीर आरोप अन् मोदींवरही निशाणा

“वोट बँकेसाठी काँग्रेसने बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या अमर कृतिचा अपमान केला,” असा आरोप शाह यांनी केला. तसेच स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरमचा जयघोष करत बलिदान देणाऱ्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांचाही या भूमिकेमुळे अपमान होत असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधींवरही निशाणा

अमित शाह यांनी काँग्रेसच्या भूमिकेवरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावरही निशाणा साधला. काँग्रेस आज स्वतःच्या 1937 च्या ठरावाचे पालन करत असून, संसदेत मंजूर झालेल्या कायद्याला नाकारत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबईच्या दोन डॉक्टरांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार; जिनांचा ‘तो’ आजार ठेवला गुप्त

‘काँग्रेसच्या निर्णयाचा विरोध करु’

“राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा एकदा तुष्टीकरणाच्या राजकारणाला जोरदारपणे पुढे नेत आहे,” असा आरोप अमित शाह यांनी केला. तसेच, “या देशाने एकदा वंदे मातरमचे दोन तुकडे करून चूक केली आणि त्याचे परिणामही भोगले आहेत. त्यामुळे ही चूक पुन्हा होऊ नये यासाठी देशातील जनतेने एकजूट होऊन काँग्रेसच्या या निर्णयाचा विरोध करावा. भाजपही संसदेत या निर्णयाला विरोध करेल,” असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

follow us