अमित शाहांनी केली मोठी भविष्यवाणी; सांगितलं किती जागा जिंकत मोदी होणार तिसऱ्यांदा PM

अमित शाहांनी केली मोठी भविष्यवाणी; सांगितलं किती जागा जिंकत मोदी होणार तिसऱ्यांदा PM

Amit Shah On Election 2024 : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी (Political Party)निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपने (BJP) 2024 च्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections)तयारीही सुरु केली आहे. याचदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सोमवारी आसाममधील(Assam) दिब्रुगड येथे निवडणुकीबद्दल मोठा दावा केला आहे. ते दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर होते. त्यावेळी एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 300 हून अधिक जागा मिळतील आणि नरेंद्र मोदी(Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान (Prime Minister)होतील, असा दावा अमित शाहांनी (Amit Shah)केला आहे.

माझ्याशी डावपेच खेळू नका, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला फटकारले

केंद्रीय मंत्री अमित शाहांनी भाजपच्या दिब्रुगड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात आगामी लोकसभा निवडणूक 2024 बद्दल मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची नेत्रदीपक कामगिरी होईल. आसाममध्ये भाजप 14 पैकी 12 जागा जिंकेल. एवढंच नाही तर देशभरात भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल आणि मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील असंही ते म्हणाले.

यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, ईशान्य भाग हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, परंतु राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतरही, या प्रदेशातील तीन राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

ते म्हणाले की, मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्रिपुरामध्ये भाजपने सरकार स्थापन केले आणि इतर दोन राज्यांमध्ये युती भागीदार म्हणून सत्तेवर आले. राहुल गांधींनी इंग्लंडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अमित शाहांनी जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, की राहुल गांधींनी परदेशात भारताचा अपमान केला आहे. त्यांनी असेच सुरू ठेवले तर काँग्रेस केवळ ईशान्येतूनच नाही तर संपूर्ण देशातून नष्ट होईल, असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube