जे गेटच्या बाहेर येत नव्हते, ते आता शेतकऱ्यांच्या बांधावर…; CM शिदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

जे गेटच्या बाहेर येत नव्हते, ते आता शेतकऱ्यांच्या बांधावर…; CM शिदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Eknath Shinde : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी निपाणी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या. पावसाअभावी करपत चाललेल्या शेतमालांची पाहणी केली. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

‘त्यांना’ मुख्यमंत्र्याचं मंत्री व्हावं लागलं; शरद पवारांचे फडणवीसांना रोखठोक उत्तर, ठाकरेंवर काय म्हणाले ? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांनी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. जे कधी आपल्या घराच्या गेटच्या बाहेर येत नव्हते, ते आता शेतकऱ्यांना बांधावर जाऊन भेटू लागले, आनंद आहे, असा टोला त्यांनी लगावला.

लोकसभेला भाजपच्या नेत्यांनी प्रणिती शिंदेंना मदत केली; सुशीलकुमार शिदेंचा गौप्यस्फोट 

पापाचा घडा लपवण्यासाठी सरकारवर त्यावर योजनाचं पांघरून घालतेय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्याविषयी विचारलं असता शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही जी अभद्र युती केली, त्याचा परिणाम विधानसभेत भोगावे लागेल. पापाचा घडा कोणाचा भरला हे तुम्हाला विधानसभेत जनता दाखवेल, असं शिंदे म्हणाले.

आम्ही महिला-भगिनींना लाडली बहीण योजनेअंतर्गत 18 हजार रुपये देत आहोत, तीन सिलेंडर मोफत देत आहोत. ही भावाकडून बहिणीला भाऊबीज आणि रक्षाबंधन भेट आहे. कारण आमच्या सरकारची देण्याची दानत आहे. तुम्ही तर काही दिलं नाही. कधी देण्याचा प्रयत्न केला नाही. तुमची देण्याची दानत नाही, अशी टीका सीएम शिंदेंनी केली.

आम्हीच खरी शिवसेना
कितीवेळा लहान बाळासारखं रडणार? ग्रामपंचायतीत लोकांना त्यांना सहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवलं. आमच्या बाळासाहेबांच्या विचारांना मानणारी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. लोकसभा निवडणुकीतही आम्हाला जास्त मत मिळाली. 19 टक्के पैकी 14 टक्के मते आमच्याकडे आली आहेत. पक्षचोरला,चोरला हे किती वेळ बोलणार? आम्हीच खरी शिवसेना आहोत हे आता लोकांनीही शिक्कामोर्तब केले आहे, असं शिंदे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube