सुवर्ण मंदिरात महिलेचा योगा, जाहीर माफी अन् जीवे मारण्याच्या धमक्या; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Archana Makwana : 21 जून रोजी संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अर्चना मकवाना (Archana Makwana) या महिलेविरोधात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
माहितीनुसार, 21 जून रोजी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या आवारात अर्चना मकवानाने योगासने केल्याने तिच्या विरोधात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याच बरोबर एसजीपीसीने कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल तीन कर्मचाऱ्यांना नोकरीवरून बडतर्फ करत प्रत्येकी 5,000 रुपये दंड ठोठावला आहे.
या प्रकणारात समोर आलेल्या माहितीनुसार, 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त करण्यासाठी अर्चना मकवानाने सुवर्ण मंदिराच्या आवारात योग केला होता आणि त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर (Instagram) फोटो पोस्ट केले होते ज्यावर गुरुद्वारा पॅनेलने नाराजी दर्शवत शीखांच्या भावना आणि प्रतिष्ठा दुखावल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदर सिंगधामी यांनी सांगितले की, सुवर्ण मंदिरात या महिलेने योग केल्यानंतर प्रार्थना न करता मंदिर सोडले.काही लोक जाणूनबुजून पवित्र स्थानाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व दुर्लक्षित करून घृणास्पद कृत्ये करतात मात्र लोकांनी हे करू नये ज्यानंतर त्यांना माफी मागावी लागेल.
प्रकरण वाढल्यानंतर अर्चना मकवानाने इंस्टाग्रामवरून सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले आहे तसेच या प्रकरणात तिने माफी देखील मागितली आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, तिचा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मला माहित नव्हते की, गुरुद्वारा साहिब परिसरात योग करणे काहींसाठी आक्षेपार्ह असू शकते. माझा हेतू फक्त योग करण्याचा होता कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र तरीही मी मनापासून माफी मागते आणि भविष्यात अधिक सावध राहण्याचे वचन देते.
पुढील 5 दिवस सावधान! कोकण, मराठवाड्यासह ‘या’ भागात धो धो पावसाला होणार सुरुवात
माझी प्रामाणिक माफी स्वीकारा असं तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे. तर दुसऱ्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिने जाहीर माफी मागितली आहे मात्र तिला फोन कॉलवर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत असं तिने म्हटले आहे.