राज्यपालांवर हल्ला करण्याचा मुख्यमंत्र्यांचा कट; आरीफ मोहम्मद खान यांचा थेट आरोप

राज्यपालांवर हल्ला करण्याचा मुख्यमंत्र्यांचा कट; आरीफ मोहम्मद खान यांचा थेट आरोप

Arif Mohammad Khan : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शारीरिक दुखापत करण्याचा कट रचल्याचे आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे. केरळमध्ये घटनात्मक व्यवस्था कोलमडली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीला जाण्यासाठी तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात असताना सीपीआय(एम)ची विद्यार्थी शाखा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाला धडक दिली. ही घटना मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या सूचनेनुसार गुंडांनी केल्याचा आरोप केरळच्या राज्यपालांनी केला आहे.

चिडलेले राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी कारमधून बाहेर येऊन मीडियाला सांगितले की सीएम विजयन यांनीच त्यांना शारीरिक दुखापत करण्यासाठी गुंडांना पाठवण्याचे ‘षडयंत्र’ रचले होते. गव्हर्नर खान यांनी पोलिसांवरही सुरक्षेत त्रुटींचा ठेवल्याचा आरोप केला आहे.

‘जम्मू-काश्मीर आरक्षण’ आणि ‘पुनर्रचना विधेयक’ राज्यसभेतही मंजूर, काय होणार बदल?

राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांप्रकरणी केरळ पोलिसांनी 20 एसएफआय कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या एका दिवसानंतर हे आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, खान हे भारतीय उद्योग महासंघातर्फे आयोजित कार्यक्रमासाठी जात असताना तिरुअनंतपुरम येथील वझुथाकौडजवळ राज्यपालांंना काळे झेंडे फडकवण्यात आले.

Article 370 : …तर मग नेहरुंनी ‘तात्पुरतं’ असा शब्द का वापरला? अमित शाहांनी विरोधकांना फटकारलं

या घटनेप्रकरणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) अठरा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर राज्यपाल कार्यक्रमातून परत येत असताना त्यांना पुन्हा काळे झेंडे दाखण्यात आले. सीपीआय(एम) च्या विद्यार्थी शाखा एसएफआयच्या आणखी दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, असे पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube