सिनेमांच्या मदतीने मोदी निवडणुका जिंकणार का? ओवीसींचा हल्लाबोल

सिनेमांच्या मदतीने मोदी निवडणुका जिंकणार का? ओवीसींचा हल्लाबोल

Asaduddin Owaisi Criticism on PM Modi : ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा सध्या वेगळ्याच कारणामुळे वादात सापडला आहे. सिनेमावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यातच AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या सिनेमावर भाष्य केले आहे. हा खोटा प्रचार करणार सिनेमा आहे. तसेच या सिनेमांच्या मदतीने पंतप्रधान निवडणूक जिंकणार का?’ असा प्रश्न ओवेसींनी विचारला आहे.

सध्या देशात कर्नाटक निवडणुकीचा वारे वाहू लागले आहे. या प्रचारादरम्यान नेत्यांचा एकमेकांवर हल्लाबोल देखील सुरु आहे. यातच कर्नाटकमधील एका रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा उल्लेख केला, जो लव्ह जिहादच्या घटनांवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे.

केरळ स्टोरी सिनेमा 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाली आहे. तथापि, द केरळ स्टोरी सिनेमा रिलीज होण्यापूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होती. दरम्यान सिनेमा रिलीज झाल्यादिवशी त्याला विरोधाचा सामना करावा लागला. अनेकांनी वेगवेगळ्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपटाविरोधात निदर्शने केली.

ओवेसींचा मोदींना टोमणा
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. द केरळ स्टोरी हा खोटा प्रचार असल्याचे ओवेसी म्हणाले आणि आता पंतप्रधानांना निवडणुका जिंकण्यासाठी चित्रपटांचा अवलंब करावा लागेल असे म्हटले आहे.

ओवेसी यांनी ट्विट केले आहे की, पंतप्रधान मोदींना निवडणूक जिंकण्यासाठी खोट्या प्रचारावर बनवलेल्या चित्रपटाचा अवलंब करावा लागला आहे. याशिवाय एका सभेत ओवेसींनी कर्नाटक निवडणुकीत हिजाब बद्दल न बोलल्याबद्दल काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. ओवेसी म्हणाले की, जेव्हा तुम्ही काँग्रेसला विचारता की निवडणुकीत हिजाब का वापरला जात नाही, तेव्हा ते गप्प बसायला सांगतात. का भाऊ, आम्ही आमच्या मुलींच्या डोक्यावर हिजाब बद्दल बोलतो, तुम्ही तोंडावर हिजाब लावला आहे.

पंतप्रधान मोदींनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी एका सभेत ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित केला होता. याशिवाय काँग्रेस याप्रकरणी कटकारस्थानांची बाजू घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा अप्रत्यक्षपणे संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, केरळमधील घटनांवर आधारित दहशतवादाच्या नवीन स्वरूपावर चित्रपट बनवण्यात आला आहे.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, काँग्रेसने नेहमीच व्होट बँकेचे राजकारण केले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे दहशतवाद वाढला आहे.गेल्या काही वर्षांत दहशतवादाचे स्वरूप बदलले आहे. सध्या केवळ बंदुका आणि बॉम्बचा वापर करून दहशतीच्या घटना घडत नाहीत. आता दहशतवादाचे नवनवीन प्रकार समोर येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube