Balasore Train Accident : रेल्वे अपघातात नवा ट्विस्ट; CBI कडून आमिर खानचं घर सील
Balasore Train Accident : काही दिवसांपूर्वी ओडिसातील बालासोर येथे तीन रेल्वेंची धडक होऊन भीषण अपघात झाला होता. या भीषण घटनेत 290 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले होते. आता या अपघाताला एक नवं वळन मिळालं असून, सीबीआयकडून ज्युनिअर इंजिनीअर आमिर खानचं घर सील करण्यात आले आहे. अपघातानंतर सीबीआयकडून सिग्लन JE खान याची चौकशी करण्यात आली होती. तेव्हापासून खान त्याच्या कुटुंबापासून बेपत्ता झाला आहे. या भीषण अपघाताचा तपास सीबीआयकडून 6 जून रोजी सुरू करण्यात आला. त्याआधी या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिममध्ये छेडछाड होण्याची शक्यता लक्षात घेत सरकारकडून सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले.
उद्धव ठाकरेंचा जन्मदिवस ‘देशद्रोही दिवस’ म्हणून घोषित करा, नितेश राणेंची यूनोकडे मागणी
292 प्रवाशांचा मृत्यू
या भीषण अपघातात आतापर्यंत २९२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, सुमारे 1200 जण जखमी झाले. यामध्ये 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांसह पंतप्रधान मोदींनी स्वतः बालासोरला जाऊन घटनास्थळीची पाहणी करत जखमींची विचारपूस केली होती. जवळपास 51 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आले होते.
‘शिंदे गुवाहाटीत नव्हे अयोध्येत करणार होते बंड’; ठाकरे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट
विरोधकांकडून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती
ओडिसातील या भीषण अपघातानंतर विरोधकांकडून सरकारवर अनेक प्रश्नांचा भडिमार करत गंभीर आरोप करण्यात आले. यात प्रामुख्याने ‘सुरक्षा कवच’ भारतात असताना ते ट्रेनमध्ये का बसवण्यात आले नाही, असा सवाल विरोधकांनी केला. मात्र, हा अपघात सुरक्षा कवच नसल्यामुळे झाला नसून अन्य काही कारणांमुळे झाला असल्याचे रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Ganesh Sugar Factory Election; ‘ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा’, थोरातांचा विखेंवर हल्लाबोल
सिग्लन अभियंत्याची भूमिका महत्त्वाची
या भीषण अपघाताला सिग्लन यंत्रणेतील बिघाड किंवा छेडछाड कारणीभूत असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्या दृष्टीने सीबीआयकडून सखोल चौकशी केली जात आहे. या अपघातानंतर सीबीआयकडून ज्युनिअर इंजिनीअर आमिर खानची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर 19 जून रोजी सीबीआयचं एक पथक पुन्हा अपघातस्थळी गेले होते. त्यावेळी अन्नपूर्णा राईस मिलजवळील सिग्नल जूनियर इंजीनियर त्याच्या कुटुंबासह बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याचे घर सील करण्यात आले आहे. खान त्याच्या कुटुंबासह येथे भाड्याने राहत होता अशीदेखील माहिती समोर आली आहे. ट्रेन ऑपरेशन्सची सुरक्षा राखण्यासाठी सिग्नल अभियंत्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या अभियंत्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सिग्नलिंग उपकरणांची स्थापना, देखभाल आणि दुरुस्ती आदींसह सिग्नल, ट्रॅक सर्किट्स, पॉइंट मशीन्स आणि इंटरलॉकिंग सिस्टमचा समावेश आहे.
#WATCH | Balasore train accident | "A few media reports are coming in that a Bahanaga staff is absconding and missing. This is factually incorrect. The entire staff is present & a part of inquiry. They are appearing before agency," says Aditya Kumar Chaudhary, CPRO South Eastern… pic.twitter.com/Htc538cIFp
— ANI (@ANI) June 20, 2023
कुणीही फरार नाही
दरम्यान, ज्युनिअर इंजिनीअर आमीर खान फरार असल्याच्या वृत्तावर रेल्वेकडून स्पष्टीकरणे देण्यात आले असून, बालासोर ट्रेन दुर्घटनेबाबत सीबीआय चौकशीनंतर कनिष्ठ अभियंता (JE) अमीर खान फरार झाल्याच्या बातम्या येत आहेत. या सर्व बातम्या चुकीच्या असून, तपासात सर्व कर्मचारी सीबीआय आणि सीआरएसला सहकार्य करत असून कोणीही फरार नसल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.