Telegram वर बंदी कायम, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

Telegram Ban :  21 जून रोजी होणाऱ्या री- नीट परीक्षासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत 30 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी आणली आहे.

Telegram Ban

Telegram Ban :  21 जून रोजी होणाऱ्या री- नीट परीक्षासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत 30 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी आणली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावाई करत न्यायालायाने ही याचिका फेटाळत टेलिग्रामला मोठा धक्का दिला आहे. 3 मे रोजी झालेल्या नीट पेपर फुटीप्रकरणात आरोपींकडून विद्यार्थ्यांपर्यंत पेपर टेलिग्रामद्वारे पोहोचले असल्याची माहिती मिळाल्याने केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत देशात टेलिग्रामवर बंदी घातली आहे.

टेलिग्रामद्वारे प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप

या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने असा युक्तिवाद केला की, टेलिग्राम (Telegram Ban) हे दहशतवादी कारवायांसाठी एक सोपे आणि सोयीस्कर व्यासपीठ बनले आहे. या व्यासपीठावर अनेकदा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप झाले आहेत. तसेच, फसवणूक आणि सायबर गुन्हे करण्यासाठीही या व्यासपीठाचा वापर केला जातो. बंदी घालण्यापूर्वी टेलिग्रामला (Telegram) आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती आणि कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने या प्रकरणाचा आढावा घेतला होता असा युक्तिवाद केंद्र सरकारकडून न्यायालयात करण्यात आला.

तर दुसरीकडे केंद्र सरकारने केवळ तात्पुरते आणि अल्पकालीन निर्बंध घातले आहेत. प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्यामुळे, या आदेशाला अवाजवी मानता येणार नाही. त्यामुळे, केंद्र सरकारचा निर्णय कायम राहिला असून टेलिग्रामला त्याचे पालन करणे बंधनकारक आहे असं निकाल देताना न्यायमूर्ती तेजल कारिया (Tejal Karia) म्हणाले.

पुढील महिन्यात लग्न, जयपुरात कोटींचा पॅलेस अन् 2 विमान बुक पण लोहगडावर भावी पत्नीला गिफ्ट देण्यापूर्वीच प्रसिद्ध बिल्डरलच्या मुलाचा मृत्यू-

 बंदीमागील कारणे

टेलिग्रामवरील एका ग्रुपमध्ये सुमारे 2,00,000 पर्यंत सदस्य असू शकतात. या ॲपवर अत्यंत मोठ्या फाइल्स साठवण्याची सुविधा आहे आणि मोबाईल क्रमांकाशिवायही खाते (Account) तयार करता येते. टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ही दोन्ही मेसेजिंग ॲप्स असली, तरी व्हॉट्सॲपच्या तुलनेत टेलिग्राममध्ये गोपनीयतेची (Privacy) जास्त फीचर्स  उपलब्ध आहेत.

follow us