हत्येपूर्वी अतिक अहमदने सुप्रीम कोर्टाला लिहिले होते पत्र

  • Written By: Published:
हत्येपूर्वी अतिक अहमदने सुप्रीम कोर्टाला लिहिले होते पत्र

Atiq Ahmed Written Letter Supreme Court : अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांचे वकील विजय मिश्रा या हल्ल्यात मारल्या गेलेल्या गुंड बंधूंनी लिहिलेले पत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहेत. या पत्रात अतिकने आपल्या हत्येची भीती व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. असा दावाही केला जात आहे की, या पत्रात अतिकने विविध क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींची नावेही लिहिली आहेत ज्यांनी अतिकविरोधात कट रचला आहे किंवा त्याच्या गुन्ह्यांमध्ये त्याला पाठिंबा दिला आहे. वृत्तवाहिनी टाइम्स नाऊ नवभारतकडे अतिकचे ते पत्र आहे. त्याचे तपशील सार्वजनिक केले गेले नाहीत.

त्यापत्रात अतिक अहमद यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला उद्देशून काही गोष्टी आहेत. हस्तलिखित पत्र सर्वोच्च न्यायालय यांना’ असे लिहिले होते. यानंतर हा विषय काय आहे आणि तपशील काय आहेत, हे अद्याप सार्वजनिक केलेले नाही. अतिक यांनी हे पत्र एका माजी खासदाराच्या भूमिकेतून सर्वोच्च न्यायालयाला लिहिले आहे. ‘अतिक अहमद, माजी खासदार’ असे पत्रात लिहिले आहे. खाली कार्यालयाचा पत्ता आणि काही फोन नंबर दिले आहेत.

अतिकच्या ‘त्या’ शेवटच्या पत्रात काही ‘बड्या’ नेत्यांची नावे?

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची सुरक्षा गराड्यातच तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. शनिवारी रात्री 10.30 वाजता प्रयागराजमधील कोल्विन हॉटेलबाहेर मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर झालेल्या दुहेरी हत्याकांडावरून राजकीय खळबळ उडाली आहे. विरोधक उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार आणि तेथील पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेच्या रात्रीच या प्रकरणाच्या अधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन हल्लेखोरांची पार्श्वभूमी आणि हत्येमागील त्यांचा हेतू अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर सध्या चर्चेला वेग आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube