बारावीत कमी गुण असतील तर सावधान!….अन्यथा खोली मिळणार नाही भाड्याने
Less Than 12th Marks You Will Not Get Room For Rent : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या अनोख्या घटनेची व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्या व्यक्तीने हा स्क्रीन शॉट शेअर केला आहे त्याने दावा केला आहे की त्याच्या पुतण्याला 12वीत कमी गुण मिळाल्यामुळे घरमालकाने खोली नाकारली होती. आता या प्रकरणावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
घरमालकाने बंगलोरमध्ये खोली दिली नाही
हे खरे आहे की मेट्रो शहरांमध्ये भाड्याने खोली शोधणे अत्यंत कठीण आहे कारण मेट्रो शहरांमध्ये खोल्यांची मागणी नेहमीच असते. आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेंगळुरू शहरात हे आणखी कठीण आहे. बंगलोरमध्ये खोलीचे भाडेही खूप जास्त आहे. इथे कधी-कधी घरमालकाच्या विचित्र मागण्याही लोकांना अडचणीत आणतात. अलीकडेच एका व्यक्तीने व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीन शॉट शेअर केला आणि दावा केला की बंगळुरूमध्ये त्याच्या पुतण्याला 12वीमध्ये कमी गुण आल्यामुळे घरमालकाने त्याला खोली द्यायला नकार दिला.
“Marks don’t decide your future, but it definitely decides whether you get a flat in banglore or not” pic.twitter.com/L0a9Sjms6d
— Shubh (@kadaipaneeeer) April 27, 2023
घरमालक-भाडेकरूचा स्क्रीनशॉट ट्विटरवर व्हायरल होत आहे
घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील संभाषणाचा मेसेज ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. आधी घरमालक खूप खुश होतो, नंतर काही कागदपत्रांची मागणी केली. भाडेकरू कंपनीचे ऑफर लेटर शेअर करतो, त्यानंतर घरमालक 10वी आणि 12वीची मार्कशीट मागतो. इतकंच नाही तर पॅन कार्ड आणि आधार कार्डची मागणी केल्यानंतर घरमालक एक विचित्र मागणी करतो आणि स्वतःबद्दल 200 शब्द लिहायला सांगतो. या सर्व प्रकारानंतर, ब्रोकर भाडेकरूला कळवतो की, 12वीमध्ये केवळ 75% गुण मिळाल्यामुळे घरमालकाने खोली देण्यास नकार दिला आहे.