गोवा अग्नीतांडवानंतर भुवनेश्वरच्या नाईट क्लबला आग; नुकसानीचा आकडा अद्याप समोर नाही

Bhuvneshwar Night Club गोवा अग्नीतांडवानंतर भुवनेश्वरच्या सत्य विहार भागामध्ये शुक्रवारी 12 डिसेंबर 2025 ला नाईट क्लबला भीषण आग लागली

Bhuvneshwar Night Club Fire

Bhuvneshwar Night Club Fire after Goa Night Club Fire : गोवा अग्नीतांडवानंतर भुवनेश्वरच्या सत्य विहार भागामध्ये शुक्रवारी 12 डिसेंबर 2025 ला नाईट क्लबला भीषण आग लागली. यामध्ये इमारतीतून प्रचंड धूर निघत होता. मात्र अद्याप या दुर्घटनेमध्ये कोणतंही नुकसान किंवा जिवीत हानी झाल्याचं समोर आलेलं नाही. या अगोदर गोव्यामध्ये अशाचं प्रकरे नाईट क्लबमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली होती.

गोवा अग्नीतांडवानंतर भुवनेश्वरच्या नाईट क्लबला आग

भुवनेश्वरच्या सत्य विहार भागामध्ये शुक्रवारी 12 डिसेंबर 2025 ला नाईट क्लबला भीषण आग लागली. या आगीचे लोट प्रचंड मोठे असल्याने त्यात केवळ नाईट क्लबच नाही तर शेजारील फर्निचर दुकानाला देखील आगीने वेढलं. येथे देखील लाकडी आणि फोमच्या वस्तू असल्याने ही आग आणखी भीषण झाली. यामध्ये दुकानाचं प्रचंड नुकसान झालं आहे. या आगीमुळे खप वेळ दृश्यमानता कमी असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली.

भाजप- शिवसेना एकत्र लढणार महापालिका निवडणूक; शिंदेंसोबतच्या मॅरेथॉन बैठकीनंतर मोठा निर्णय

या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन यंत्रणेच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.  मात्र अद्याप या दुर्घटनेमध्ये कोणतंही नुकसान किंवा जिवीत हानी झाल्याचं समोर आलेलं नाही. या अगोदर गोव्यामध्ये अशाचं प्रकरे नाईट क्लबमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली होती.

Pune Airport : मोठी बातमी! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या 7 महिन्यांनी जेरबंद

दुसरीकडे गोवा नाईटक्लब आग प्रकरणात मुख्य आरोपी लुथरा बंधूंना थायलंडमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपी गौरव लुथरा आणि सौरव लुथरा यांच्या भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु करण्यात आली असल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. लथुरा बंधूंनी या प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. त्यांच्या या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार होती मात्र त्यापूर्वीच त्यांना थायलंड पोलिसांनी अटक केली आहे.

follow us