महिला आरक्षण बदलवणार देशाचं राजकीय चित्र! लोकसभेच्या देशात 816 तर राज्यात वाढणार एवढ्या जागा…

increase Loksabha Seats लोकसभा खासदारांची संख्या थेट 816 वर जाणार आहे. तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांची संख्या ही 48 करून 72 वर जाईल.

Loksabha Session

BJP Government will increase Loksabha Seats for 33 percent women quota : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ज्यामध्ये सरकारकडून देशातील लोकसभा मतदारसंघाच्या जागांवर महिला आरक्षण लागू करण्यासाठी दोन विधेयक सादर करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 22 पक्षांसोबत चर्चा केली. ही विधेयकं मंजूर झाल्यानंतर लोकसभा मतदारसंघांमध्ये महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ फेररचना करण्यात येईल. त्यामुळे लोकसभा खासदारांची संख्या थेट 816 वर जाणार आहे. तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांची संख्या ही 48 करून 72 वर जाईल. तर देशभरामध्ये आरक्षण असणारच त्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभेच्या जागांमध्ये 50% ची वाढ

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार सरकार हे विधेयक आणणार आहे. त्यानुसार लोकसभेचे सध्याचे एकूण 543 मतदारसंघ हे जवळपास 50 टक्क्यांनी वाढून थेट 816 केले जाऊ शकतात. त्यामुळे लोकसभेच्या जागांमध्ये 273 नव्या मतदारसंघांची निर्मिती केली जाईल. यामध्ये जास्तीत जास्त महिलांसाठी हे मतदारसंघ आरक्षित असतील. त्यामुळे संसदेतील बहुमताचा आकडा देखील वाढेल हा आकडा 409 वर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

धक्कादायक! पिडीतेने आमदाराला व्हिडीओ दाखवले पण… खरातला वाचवणारा आमदार कोण? चर्चांना उधान

ही वाढ गेल्या पाच दशकांमध्ये पहिल्यांदाच होत आहे. ज्यामध्ये सध्या असलेल्या पुरुष खासदारांच्या राजकीय करिअरला कोणताही धोका नाही. राज्यसभा आणि राज्यातील विधान परिषदेच्या संख्येवर देखील याचा कोणताही परिणाम होणार नाही. दरम्यान ही मतदारसंघ पुनर्रचना करण्यासाठी 2011 मध्ये करण्यात आलेली जनगणना गृहीत धरले जाईल.

सातारा झेडपीतील खडाजंगीवर रात्री उशीरा बैठक, फडणवीसांकडून शिंदेजवळ नाराजी व्यक्त; वाद शमणार की…

2023 मध्ये नारीशक्ती वंदन अधिनियम हे विधेयक जारी करण्यात आले होते. यामध्ये लोकसभेमध्ये महिला आरक्षण तेहतीस टक्के केले जाईल असं म्हटलं गेलं. याची अंमलबजावणी आता या विधेयकातून करण्यात येणार आहे. मात्र हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी एकट्या भाजपकडे बहुमत नाही. त्यामुळे सरकार लवकरात लवकर हे विधेययक मंजूर करण्यावर भर देत आहे. तसं न झाल्यास महिला आरक्षणाच्या मुद्द्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलावले जाईल. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या विधेयकाच्या पाठिंब्यासाठी एनडीए किंवा इंडिया अशा कोणत्याही आघाडीशी संलग्न नसलेल्या पक्षांसोबत बैठक घेत आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजपच्या मित्र पक्षांसोबत देखील बैठक घतली. त्यामुळे सोमवारी त्यांच्या या विधेयकासंदर्भात दोन बैठका पार पडल्या. त्यामुळे आता हे विधेयक कधी मांडलं जाणार आणि ते मंजूर होणार का? हे महत्त्वाचं ठरणार आहे.

 

follow us