‘हिंमत असेल तर अदानी-पवार भेटीवर बोला’ ; भाजप नेत्याचे राहुल गांधींना चॅलेंज
Adani Hindenburg Case : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) प्रकरणी मोदी सरकारची कोंडी करत काँग्रेसने देशभरात रान उठवले होते. हिंडेनबर्गचा अहवाल (Hindenburg Case), अदानींच्या शेल कंपन्यांत वीस हजार कोटी रुपये कुठून आले ?, याची चौकशी करा. त्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे काही वक्तव्य केले की त्यामुळे विरोधकांच्या आरोपांतील हवाच निघून गेली.
यानंतर गौतम अदानी स्वतः शरद पवार यांच्या भेटीसाठी आल्याचे देशाने पाहिले. दोघांत बराच वेळ चर्चा झाली. पण, ही चर्चा काय होती ?, याचा तपशील अजून तरी बाहेर आलेला नाही. या भेटीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनीही एका कार्यक्रमात अदानी – पवार भेटीवर भाष्य केले.
अतिक-अशरफ हत्याप्रकरणी यूपी सरकार सर्वोच्च न्यायालयात; ‘कॅव्हेट’ म्हणजे काय?
बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ट्विट करून दाखवा, असे आव्हान दिले.
ते म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की आम्ही अदानी यांचे मित्र आहोत. मी तर त्यांना ओळखतही नाही. ईशान्येकडील लोकांना अदानी, अंबानी, टाटांपर्यंत पोहोचायला आणखी वेळ लागेल. आम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. पण राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर मी त्यांना शरद पवारांविरोधाात ट्विट करण्याचे आव्हान देतो. पवारांना अदानींबरोबरच्या संबंधांवर प्रश्न विचारा ना ?’, असा सवाल करत हे लोक फक्त सोयीचे राजकारण करत असल्याचा आरोप बिस्वा सरमा यांनी केला.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी वंदे भारत ट्रेनवर खासदाराचे पोस्टर चिकटवले, गुन्हा दाखल
ते पुढे म्हणाले, ‘ज्यावेळी अदानी शरद पवारांच्या घरी जातात आणि तेथे दोन ते तीन तास घालवतात. तेव्हा राहुल गांधी ट्विट का करत नाहीत. मला या दोघांच्या भेटीबाबत काहीच समस्या नाही.’
काय घडलं होतं ?
तसे पाहिले तर राहुल यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी हिमंता बिस्वा सरमा, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या काही नेत्यांची नावे अदानींसोबत जोडले होते. हे सत्य लपवतात, म्हणूनच रोज दिशाभूल करतात, असे राहुल यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले होते.