‘कारवाई झाली नाही तर हायकोर्टात जाणार’; वंदे मातरम् वादाप्रकरणी सोनिया गांधींविरोधात भाजपची तक्रार
Sonia Gandhi : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’चे गायन सुरू असताना सोनिया गांधी यांनी केलेल्या कथित इशाऱ्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
BJP lodges complaint against Sonia Gandhi : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ गायनादरम्यान झालेल्या वादावरून काँग्रेस (BJP) नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. तक्रारदार भाजप नेते विकास पुत्तूर यांनी या प्रकरणी कारवाई नाही. तर कर्नाटक उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’चे गायन सुरू असताना सोनिया गांधी यांनी केलेल्या कथित इशाऱ्यांवरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी भाजप नेते विकास पुत्तूर यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
मंगळुरूमध्ये भाजप नेते विकास पुत्तूर यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करत उरवा पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. कर्नाटक सरकारने या तक्रारीवर कारवाई केली नाही. तर कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तक्रारदाराने हायकोर्टात जाण्याचा दिला इशारा
भाजप नेते विकास पुत्तूर यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्य सरकार आणि पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरले, तर मी कर्नाटक उच्च न्यायालयात खासगी तक्रार दाखल करेन. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. संपूर्ण देशाने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी काँग्रेसच्या कार्यक्रमात घडलेला प्रकार पाहिला आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने ‘वंदे मातरम्’ला विरोध करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पुत्तूर यांनी आरोप केला की, नवी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ सुरू असताना सोनिया गांधी यांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात अडथळा आणला. त्यांनी दावा केला की, “काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’ सुरू असताना सोनिया गांधी यांनी कार्यक्रमात अडथळा आणला. सोनिया गांधी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ‘वंदे मातरम्’ थांबवण्यास सांगत असल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे. पुत्तूर यांनी म्हटले की, ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
नेमका वाद काय आहे?
हा संपूर्ण वाद 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाशी संबंधित आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण गायन सुरू असताना सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलताना आणि काही इशारे करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओवरून भाजपने तीव्र आक्षेप घेतला असून, देशभरातूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसने सोनिया गांधी यांच्या कृतीचा कार्यक्रमात वाजवण्यात आलेल्या राष्ट्रगीताशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ योग्य पद्धतीने गायले जात आहे की नाही, याची खात्री करण्याचा त्या प्रयत्न करत होत्या, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.