हनीट्रॅपमध्ये अडकला बीएसएफचा कर्मचारी; हेरगिरी करुन पाकिस्तानला पाठविली अत्यंत संवेदनशील माहिती

हनीट्रॅपमध्ये अडकला बीएसएफचा कर्मचारी; हेरगिरी करुन पाकिस्तानला पाठविली अत्यंत संवेदनशील माहिती

Honeytrap : गुजरात एटीएसने आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला. या कारवाईत एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका बॉर्डर सिक्युरीटी फोर्सच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. नीलेश वालिया असे त्याचे नाव आहे. गुजरात एटीएसच्या म्हणण्यानुसार, या कर्मचाऱ्याने पाकिस्तानला गुप्तचर माहिती शेअर केली आहे. माहिती देण्याच्या बदल्यात 25 हजार रुपयेही मिळाले आहेत. या नेटवर्कचे कनेक्शन उत्तप प्रदेशमध्येही पसरले असून गुजरात एटीएसच्या इनपुटवरून  उत्तर प्रदेश एटीएसनेही तपास सुरू केला आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेली अधिक माहिती अशी की, नीलेश हा अदितीच्या नावाने बनावट प्रोफाइलद्वारे पाकिस्तानातून हँडलरच्या संपर्कात होता. यानंतर बीएसएफशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती आयएसआयला पाठवली. त्याबदल्यात त्याला 25 हजार रुपयेही देण्यात आले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची एटीएस चौकशी करत आहे. यादरम्यान अनेक महत्त्वाची माहितीही समोर आली आहे.

काश्मीरपासून उत्तराखंडपर्यंत पावसाचा कहर; भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रा स्थगित

गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आरोपीच्या मोबाईलच्या एफएसएल अहवालातून अनेक तपशील समोर आले आहेत. त्याची चौकशी सुरू असून काही मोठे खुलासेही होऊ शकतात. हेरगिरीच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये आयएसआयचा सहभाग असल्याचा गुजरात एटीएसला संशय आहे. गुजरात एटीएसने काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करून आयएसच्या भारतीय मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता.

मागील दोन महिन्यात हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या देशातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना एटीएसने अटक केली होती. डीआरडीओचे वरिष्ठ संचालक प्रदीप कुरुलकर आणि एअरफोर्सचे अधिकारी निखील शेंडे हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची माहिती एटीएसने दिली होती. हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर पाकिस्तानला अत्यंत संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप एटीएसकडून या दोघांवरही ठेवण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube