लालूप्रसाद यादव यांच्यावर सीबीआयचा छापा, तेजस्वी यादव यांना आठवले अजित पवार, म्हणाले..
नवी दिल्ली : नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी (Land For Job)सीबीआय (CBI)माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची आज (दि.7) चौकशी करणार आहे. लालू सध्या दिल्लीमध्ये (Delhi)आहेत. त्यांच्यावर नुकतेच किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant)करण्यात आलेय.
याआधी सोमवारी सीबीआय बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi)यांच्या घरी पोहोचली होती. सीबीआयनं राबडी देवी यांची तब्बल 4 तास चौकशी (Inquiry)केल्याचं समजतंय. यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. बिहारमध्ये ‘महागठबंधन’ सरकार स्थापन करतानाच याचा अंदाज आला होता. असं तेजस्वी यादव म्हणाले.
If you stay with BJP, you'll be Raja Harishchandra. In Maharashtra when Sharad Pawar's nephew (Ajit Pawar) went to BJP, all cases were withdrawn. When TMC's Mukul Roy when to BJP, all cases were withdrawn. If you show the mirror to BJP, this (raid) will happen: Tejashwi Yadav pic.twitter.com/IIZUMv2dar
— ANI (@ANI) March 6, 2023
हेही वाचा : BJP and NCP : महाराष्ट्रात विरोधक नागालॅंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र, असं बनणार सरकार
तेजस्वी यादव म्हणाले की “भाजपाबरोबर गेलात, तर तुम्ही राजा हरिश्चंद्र व्हाल. महाराष्ट्रात शरद पवारांचे पुतणे अजित पवार भाजपाबरोबर गेल्यावर ईडीने गुन्हे मागे घेतले होते. तृणमूल काँग्रेसचे मुकूल रॉय भाजपात गेल्यावर सर्व गुन्हे मागे घेण्यात आले. भाजपाला आरसा दाखवल्यावर किंवा प्रश्न विचारल्यावर असे प्रकार होतच राहणार,” अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.
नेमकं प्रकरण काय आहे?
लालू यादव 2004-2009 दरम्यान रेल्वेमंत्री असताना लालू कुटुंबाला रेल्वेत ग्रुप डीच्या नोकऱ्यांच्या बदल्यात भेट म्हणून किंवा अत्यंत कमी किंमतीत जमीन घेतल्याचे आरोप आहेत. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यातील आरोपींमध्ये लालूंसोबतच कुटुंबातील अनेकांची नावं आहेत. आरोपानुसार, लालू यादव रेल्वेत तात्पुरती नियुक्ती करत असत. जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तो नियमित केलं जायचं.
रेल्वे नोकरी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं ऑक्टोबरमध्ये आरोपींविरुद्ध दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. न्यायालयानं लालू यादव, राबडी देवी, मुलगी मिसा भारती आणि इतर आरोपींना 15 मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.