अधिकाऱ्याच्या घरात सापडले कोट्यावधींचे घबाड, सीबीआयकडून जप्त

अधिकाऱ्याच्या घरात सापडले कोट्यावधींचे घबाड, सीबीआयकडून जप्त

CBI seized unaccounted assets : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने मंगळवारी मोठी कारवाई केली. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जल आणि उर्जा सल्लागार (WAPCOS) चे माजी सीएमडी राजेंद्र कुमार गौतम यांच्या घरावर छापा टाकून सीबीआयने 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

सीबीआयने सांगितले की, राजेंद्र कुमार गौतम आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा नोंदवल्यानंतर आम्ही दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाझियाबादसह सुमारे 19 ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान, 20 कोटी रुपयांच्या रोख व्यतिरिक्त, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.

सुटकेस आणि बेडमध्ये रोख रक्कम ठेवल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. सीबीआयने छापेमारीत तपास केला असता त्यांना ही रोकड सापडली. दरम्यान, WAPCOS हे जलशक्ती मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सरकारचे संपूर्ण मालकीचे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. हे पूर्वी ‘वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड म्हणून ओळखले जात असे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube