CJP Protest : ‘कॉकरोच जनता पार्टी’ चे आंदोलन सुरु; जंतर-मंतरवर आंदोलनासाठी नियम काय?
Cockroach Janta Party Protest : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या क्रॉकोज जनता पार्टीचे आजपासून जंतर- मंतरवर आंदोलन सुरु झाले आहे.
Cockroach Janta Party Protest : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या क्रॉकोज जनता पार्टीचे आजपासून जंतर- मंतरवर आंदोलन सुरु झाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी क्रॉकोज पार्टी जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे. क्रॉकोज पार्टीचे (Cockroach Janta Party Protest) संस्थापक अभिजित दिपके (Abhijit Dipke) या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. तर दुसरीकडे देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जंतर-मंतरवर आंदोलनासाठी नियम काय आहे? यासाठी परवानगी कशी मिळते हे तुम्हाला माहिती आहे का? या लेखात जाणून घ्या सर्वकाही.
आंदोलनासाठी परवानगीची आवश्यकता का?
भारतीय संविधानाने नागरिकांना शांततापूर्णरीत्या एकत्र येण्याचा अधिकार नागरिकांना दिला आहे मात्र सार्वजनिक सुव्यवस्था राखणे, सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि वाहतूक व दैनंदिन जीवनात व्यत्यय येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याने जंतर-मंतरवर कोणतेही आंदोलन, रॅली किंवा धरणे आंदोलन आयोजित करण्यासाठी प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे.
परवानगी कशी मिळवली जाते?
आंदोलनाच्या काही दिवसांपूर्वी आयोजकांना दिल्ली पोलिसांकडे अर्ज सादर करावा लागतो. या अर्जावर नवी दिल्ली जिल्हा पोलीस किंवा संबंधित स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत कार्यवाही करण्यात येते. यानंतर ज्या विशिष्ट ठिकाणी निदर्शन आयोजित आहे त्या ठिकाणाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या प्राधिकरणाकडून देखील आयोजकांना एनओसी घेणे आवश्यक असते.
तसेच सुरक्षेची व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थितींबाबत पोलिसांशी थेट समन्वय साधू शकणाऱ्या एका नियुक्त संपर्क व्यक्तीचा तपशीलही प्रशासनाला हवा असतो.याचबरोबर गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या स्वयंसेवकांची यादीही आयोजकांना सादर करावी लागते. त्यांची नावे आणि संपर्क तपशील अर्जासोबत द्यावे लागते जेणेकरुन कार्यक्रमादरम्यान पोलीस प्रभावीपणे समन्वय साधू शकतील.
नियम काय आहेत?
जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडून कठोर अटींच्या अधीन राहून परवानगी दिली जाते. पोलिसांकडून जंतर- मंतरवर आंदोलनांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5.00 या वेळेतच परवानगी दिली जाते. या वेळेनंतर आंदोलकांनी जागा रिकामी करणे अपेक्षित असते. याच बरोबर प्रशासन गर्दीच्या संख्येवरही नियंत्रण ठेवते. जंतर-मंतर ही जागा सार्वजनिक असल्याने अतिगर्दी आणि सुरक्षेचे धोके टाळण्यासाठी आंदोलनातील सहभागींची संख्या साधारणपणे 1 हजार पर्यंत मर्यादित ठेवली जाते.
लंडनमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कार्यक्रमात गदारोळ, भारतीय उच्चायोगाने सुनावले खडे बोल
तसेच आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असणे आवश्यक आहे. काठ्या, शस्त्रे किंवा हिंसाचारासाठी वापरली जाऊ शकणारी इतर कोणतीही साधने बाळगण्यास मनाई आहे. रस्ते मोकळे राहतील आणि सार्वजनिक वाहतुकीत अडथळा येणार नाही, याची खात्री करण्याची जबाबदारीही आयोजकांची आहे.