Congress Session : मल्लिकार्जुन खरगेंकडून मोदी टार्गेट; म्हणाले, देशात लोकशाही आणि संविधान..
Congress Session : देशात वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, धार्मिक उन्माद विरोधकांवर पडत असलेल्या ईडी आयकरच्या धाडी, काही राज्यांतील विधानसभा निवडणुका या पार्श्वभुमीवर काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन रायपूर (छत्तीसगड) येथे सुरू झाले आहे. अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली. उद्घाटनपर भाषणात खरगे यांनी सदस्यांना मोकळेपणाने बोलण्याचे आणि एकत्रितपणे निर्णय घेण्याचे आवाहन केले. तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो माझा आणि आपल्या प्रत्येकाचा निर्णय असेल.
काँग्रेसच्या 85 व्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी सांगितले की, देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात असताना आम्ही येथे एकत्र आलो आहोत. संसदीय संस्थांना गंभीर धोक्यांचा सामना करावा लागत आहे आणि राजकीय हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
हे वाचा : Mallikarjun Kharge यांच्यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी इतिहासात केला बदल? नक्की काय घडलं
ते म्हणाले की, या वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन आमच्यासाठी आव्हानासोबतच संधीही आहे. भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo yatra) संदर्भ देत खरगे म्हणाले की, यात्रेने कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा आणि उत्साह संचारला आहे.
कार्यकारिणीत ५० टक्के आरक्षण
काँग्रेस (Congress) सुकाणू समितीने पक्षाच्या घटनेत अनेक दुरुस्त्या मंजूर केल्या आहेत. माजी पंतप्रधान, माजी पक्षाध्यक्ष आणि पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभेतील नेत्यांना सर्वशक्तिमान कार्यकारिणीत स्थायी सदस्यत्व देण्यात आले. यानंतर CWC सदस्यांची संख्या 25 पेक्षा जास्त होईल. कार्यसमितीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिला, अल्पसंख्याक आणि तरुणांना 50 टक्के आरक्षण द्यावे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सर्व संस्थांमध्ये या वर्गांना ५० टक्के आरक्षण दिले जाईल.
Mallikarjun Kharge:असे का म्हणाले राहुल गांधीबाबत;डर मुझे लगा फासला देख कर
25 वर्षात पहिल्यांदाच सुकाणू समितीच्या बैठकीला गांधी कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. सुकाणू समितीने खरगे यांना त्यांच्याशिवाय कार्यसमितीचे सदस्य नामनिर्देशित करण्याचे अधिकार दिले. खरगे यांना पक्षाचे नेतृत्व करण्यास मोकळीक देण्यात आल्याचा संदेश गांधी कुटुंबीयांना द्यायचा होता, असे मानले जाते. कुटुंबाचा त्याच्याशी काही संबंध नाही. गांधी घराणे पडद्याआडून नेतृत्व सांभाळत असल्याचा आरोप भाजप (BJP) सातत्याने करत आहे. सुरुवातीला गांधी परिवार संमेलनाला येणार नसल्याची अफवाही उठली होती. मात्र, दुपारी 3 नंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी विशेष विमानाने रायपूरला पोहोचले.
https://www.youtube.com/watch?v=NJSTBYe66R4