Cyclone Biparjoy : 200 लाईटचे पोल, 180 झाडं जमीनदोस्त ; बिपरजॉयचा गुजरातमध्ये हाहाकार

Cyclone Biparjoy : 200 लाईटचे पोल, 180 झाडं जमीनदोस्त ; बिपरजॉयचा गुजरातमध्ये हाहाकार

Cyclone Biparjoy :  महाभयंकर बिपरजॉय (Cyclone Biparjoy) चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार उडवला आहे. यामुळे तेथील नागरिकांच्या ह्रदयामध्ये धडकी भरली आहे. कारण ताशी तब्बल 145 किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये लँडफॉल सुरु झालंय. लँडफॉलनंतर गुजरातमधील द्वारका, कच्छ (Saurashtra Kutch region) आदी किनारपट्टीवर विध्वंस सुरू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत लँडफॉल सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे एकून किती विध्वंस होईल, हे स्पष्ट झालेलं नाही.

भुजचे डीएम अमित अरोरा म्हणाले की, आतापर्यंत सुमारे 150-200 विद्युत खांब पडले आहेत, 6 वीज उपकेंद्र बंद आहेत. 15 जलनिर्मिती केंद्रांवर समस्या आहेत परंतु त्यांना जनरेटर संचाचा आधार आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, सुमारे 180-200 झाडे पडली आहेत, सर्व काढण्यात आले आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, नुकसान कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

IMD ने सांगितले की, चक्रीवादळाचे अंतर जाखाऊ बंदरापासून 20 किमी आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत वादळाचा केंद्रबिंदू उतरेल. लँडफॉल मध्यरात्रीपर्यंत राहील. येत्या ५ ते ६ तासांत वादळाचा वेग कमी होईल. राजस्थानमध्ये 16 आणि 17 जून रोजी मुसळधार पाऊस पडेल.

वडोदरात बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे. शहरात मुसळधार पाऊस पडत आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाचे केंद्र सकाळी 11 वाजेपर्यंत जमिनीवर पोहोचू शकते. लँडफॉल मध्यरात्रीपर्यंत राहील. मग ते हळूहळू कमकुवत होत जाईल. त्यावेळी त्याचा वेग 75-85 किमी प्रतितास असेल. एमईटीच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी सांगितले की, सध्या वाऱ्याचा वेग ताशी 115 ते 125 किमी दरम्यान आहे. ते 140 किमी प्रतितास पर्यंत देखील जाऊ शकते. मध्यरात्रीनंतर वाऱ्याचा वेग कमी होऊ शकतो.

तसेच पश्चिम रेल्वेने सांगितले की आणखी 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, 3 गाड्या शॉर्ट टर्मिनेशन करण्यात आल्या आहेत आणि 7 गाड्या शॉर्ट-ओरिजिनेटेड आहेत. यासह, एकूण 99 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, 39 गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत, तर 38 ट्रेन शॉर्ट-टर्मिनेटेड आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube