जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट! आपचे नेते सौरभ भारद्वाज ताब्यात
Delhi Students Protest agaist Gyanesh Kumar ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आणि राजकीय संघटनांचं पुन्हा आंदोलन
Delhi Students Protest agaist ECI CEC Gyanesh Kumar AAP leader Saurabh Bhardwaj detained by Police : दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनानंतर आता पुन्हा निवडणूक आयोगातील मतभेदांनंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आणि राजकीय संघटना पुन्हा आंदोलन करत आहेत. मात्र या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती. त्यामुळे या ठिकाणी पोलीसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घ्यायला सुरूवात केली आहेयावेळी विद्यार्थी आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांना देखीलल पोलीसांनी पकडलं आहे.
चीनमध्ये विक्रीत घट, नायकीमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यावर गदा, भारतात कॅम्पस उभारण्याचं नियोजन
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सकाळी आंदोलनासाठी कार्यकर्त्यांना जमण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी CJPचे नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी आंदोलकांना बसमध्ये बसवून तिथून हलवलं. यावेळी परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. बसमधूनच आंदोलकांनी ‘जय भीम’च्या घोषणा दिल्या. तसेच ‘जब जब मोदी डरता हैं, पुलिस को आगे करता हैं’ अशा घोषणाही देण्यात आल्या.
ताब्यात घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सौरभ भारद्वाज यांनी पोलिसांच्या कारवाईवर भाष्य केलं. आपल्या घराबाहेरही पोलीस तैनात करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला. रात्रभर SHO घराबाहेर उपस्थित असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, जंतर-मंतरवर शांततापूर्ण पद्धतीने आपलं मत मांडण्यासाठी नागरिकांनी यावं, असं आवाहन त्यांनी केलं. ‘रिक्षाने, टॅक्सीने किंवा पायी या, पण आंदोलनात सहभागी व्हा’, असं भारद्वाज यांनी म्हटलं.