देवाचाच प्लॅन, आज मी बेरोजगार… अचानक नोकरी गेलेल्या Wipro कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल…
Delhi Wipro Employee's Layoff आयटी क्षेत्रातील Layoff च्या पार्श्वभूमीवर Wipro मधील एका महिला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल
Delhi Wipro Employee’s Candid Video After Layoff says Maybe It’s A Sign From God : देशातील आयटी क्षेत्रात सुरू असलेल्या Layoff च्या पार्श्वभूमीवर Wipro मधील एका महिला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ त्यांनी अचानक नोकरी गमावल्यानंतर काही क्षणांतच रेकॉर्ड केला आहे. ‘कदाचित मला नोकरीवरून काढून टाकणं हा देवाचाच काहीतरी प्लॅन असेल,’ असे म्हणत त्यांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या आहेत.नेमकं अनुकिर्ती विद्यार्थी यांच्यासोबत काय घडलं आणि त्यांच्या व्हिडिओत त्यांनी काय सांगितलं, जाणून घेऊया…
नोकरीवरून काढून टाकणं… ‘देवाचाच प्लॅन’
‘अनुकिर्ती विद्यार्थी’ या इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अनुकिर्ती या Wipro AI Solutions मध्ये मार्केटिंग अँड कम्युनिकेशन्स को-ऑर्डिनेटर म्हणून कार्यरत होत्या. 29 जून रोजी त्यांना मॅनेजर आणि HR सोबत एका मीटिंगसाठी बोलावण्यात आले. सुरुवातीला ही नेहमीसारखीच मिटिंग असेल, असे त्यांना वाटले. मात्र, या मिटिंगमध्ये त्यांना त्यांची भूमिका ‘रेडंडंट’ (Role Redundant) झाल्याचे सांगण्यात आले आणि कंपनीने त्यांना तातडीने कार्यमुक्त केले.
‘आज मी बेरोजगार आहे…’
अचानक नोकरी गेल्यानंतर अनुकिर्ती यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ज्यात त्यांनी “आज 29 जून आहे आणि HR व मॅनेजरसोबतच्या मीटिंगनंतर मी बेरोजगार झाले आहे. ज्या कंपनीत मी साडेपाच वर्षे काम केले, ती कंपनी माझ्या आयुष्याचा एक भाग बनली होती. त्यामुळे एका क्षणात तिथून बाहेर पडणं खूप कठीण झालं आहे,
‘दर महिन्याचा पगार नसेल, हीच सर्वात मोठी भीती’
नोकरी गेल्यानंतर आता पुढे काय करायचे, पुन्हा कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी शोधायची की, स्वतःचा काही व्यवसाय सुरू करायचा, याबाबत संभ्रमात आहे. मात्र, त्याहून मोठी चिंता म्हणजे दर महिन्याला मिळणारा नियमित पगार बंद होणार असल्याचे विद्यार्थी यांनी प्रामाणिकपणे कबूल केले आहे. आता प्रत्येक महिन्याला खात्यात पगार जमा होणार नाही. पुढे कमी कमाई होईल की नाही हेही मला माहिती नसल्याचे विद्यार्थी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
‘कदाचित देवाचा इशारा असेल…’
मी स्वतःहून कधीच ही नोकरी सोडली नसती. त्यामुळे कदाचित देवानेच मला इथून बाहेर पडून आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची संधी दिली असावी,” असा उल्लेख करत अचानक आलेल्या या संकटाकडेही सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न अनुकिर्ती यांनी केला आहे.
सोशल मीडियावर पाठिंब्याचा वर्षाव
अनुकिर्ती यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हजारो नेटकऱ्यांनी त्यांना धीर दिला. तुम्ही पुन्हा नक्की उभे राहाल”, “ही एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे”, स्वतःवर विश्वास ठेवा, चांगले दिवस नक्की येतील, अशा अनेक सकारात्मक प्रतिक्रिया व्हिडिओवर उमटल्या आहेत. तर, काहींनी स्वतःलाही अशाच प्रकारच्या Layoff चा सामना करावा लागल्याचे सांगत, या टप्प्यावर खचून न जाता नव्याने सुरुवात करण्याचा सल्ला दिला आहे.
एका व्हिडिओतून अनेकांच्या भावना…
आजच्या कॉर्पोरेट जगात कर्मचारी कपातीच्या घटना आता दुर्मिळ राहिलेल्या नाहीत. मात्र, अनुकिर्ती यांनी नोकरी गमावल्यानंतरही परिस्थितीला सामोरे जात आशावादाचा संदेश दिल्यामुळे त्यांचा व्हिडिओ लाखो लोकांच्या मनाला भिडल्या आहेत. नोकरी जाणे हा आयुष्याचा शेवट नसून, अनेकदा ती एका नव्या प्रवासाची सुरुवात असू शकते. संकटाच्या काळातही सकारात्मक दृष्टिकोन, स्वतःवरील विश्वास आणि नव्याने उभे राहण्याची तयारीच माणसाला पुढे घेऊन जाते, हाच संदेश अनुकिर्ती यांच्या व्हिडिओतून अधोरेखित होताना दिसत आहे.